Join us  

एंबर दिसली बॉयफ्रेंडसोबत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 8:25 PM

ब्रॅँजेलिनाच्या घटस्फोट प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले दुसरे घटस्फोटाचे प्रकरण म्हणजे जॉनी डेप आणि एंबर हार्ड यांचे होय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या ...

ब्रॅँजेलिनाच्या घटस्फोट प्रकरणानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले दुसरे घटस्फोटाचे प्रकरण म्हणजे जॉनी डेप आणि एंबर हार्ड यांचे होय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरी झाडत हे जोडपे विभक्त झाले होते. मात्र त्यानंतर दोघांच्या लाइफस्टाइलमध्ये काय बदल झालेत, याची माहिती जाणून घेण्यात सगळ्यानाच रस आहे. आता म्हणे, नुकतीच एंबर हर्ड एका क्लबबाहेर अनोळखी व्यक्तीबरोबर फिरताना बघावयास मिळाली. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘नो नेम’ क्लबमध्ये एंबर एका अनोळखी व्यक्तीबरोबर गेली होती. क्लबमध्ये तिने खूप मौजमस्ती केली. दोघेही खूपच आनंदी दिसत होते. एकमेकांचा हातात हात घेऊन दोघेही बाहेर आहे. एंबरने त्याला मिठीही मारली.  तिने पाढºया रंगाचा प्लेन टॉप त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट आणि पातळ जिंस घातली होती. तसेच तिच्याकडे काळ्या रंगाची बॅगही होती, तर तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने पिवळ्या रंगाच्या शर्टवर भुºया रंगाचे लेदरचे जॅकेट घातले होते. तसेच निळ्या रंगाचा जिंस अन् त्यावर भुºया रंगाचे शूज घातले होते. एंबर तिच्या अनोळखी मित्रासोबत क्लबबाहेर फिरतानादोघेही खूपच आनंदी होती. दोघांमध्ये काहीतरी संबंध असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जॉनी डेपसोबत विभक्त झाल्यानंतर एंबर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बघावयास मिळाली. जॉनी डेप सध्या फारसा चर्चेत नसला तरी तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त असल्याचे समजते. एंबरने जॉनी तिला मारपीट करीत असल्याचा आरोप करीत त्याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी त्यांची स्वतंत्र वाट निवडली असून, एंबर जॉनला विसरण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तिच्या नातेवाइकांनी माध्यमांमध्ये सांगितले होते. जॉनी डेप आणि एंबर हर्ड