हॉलिवूडचे (Hollywood) प्रसिद्ध अभिनेते अर्नाल्ड श्र्वार्जेनेगर(Arnold Schwarzenegger )आणि त्यांची पत्नी मारिया यांचा १० वर्ष लांब प्रक्रियेनंतर अधिकृतपणे घटस्फोट (Arnold Schwarzenegger and Maria Divorce) झाला आहे. या दोघांनी १९८६ मध्ये लग्न केलं होतं. पण अर्नाल्ड आणि त्यांची पत्नी मारियाने १० वर्षाआधी २५ वर्षाचा संसार मोडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर मंगळवारी लॉस एंजलिसमधील एका कोर्टाने दोघांच्या घटस्फोटावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं. त्यांचं ३५ वर्ष चाललेलं लग्न १० वर्षाच्या लांब प्रक्रियेनंतर मोडलं.
का घेतला घटस्फोट?
अर्नाल्ड आणि मारियाने १९८६ मध्ये लग्न केलं होतं. पण अर्नाल्डने खुलासा केला होता की, त्याच्या घरातील मेडसोबतच्या अफेअरमधून तिने बाळाला जन्म दिला. त्याचा हा मेडपासून झालेला मुलगा जोसफ बाएना आता कॉलेजमध्ये शिकत असून त्यालाही अभिनेता व्हायचं आहे. जोसफ दिसतोही त्याच्या वडिलांसारखाच.
तेव्हापासून अर्नाल्ड आणि मारियाचं नातं बिघडलं. त्यांनी २०११ साली घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांनी गपचूप एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे आरोप न लावता सहमतीने आपली घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. वेगळे झाल्यानंतरही दोघेही फॅमिली गॅदरिंग आणि मुलांसाठी एकत्र दिसले होते.
कदाचित ही आतापर्यंतची घटस्फोटाची सर्वात लांब प्रक्रिया राहिली असेल. पण हे अजूनही स्पष्ट झालं नाही की, यांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला इतका वेळ का लागला. २०११ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. जूनमध्ये कोर्टात प्रक्रिया सुरू झाली होती. पण कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
प्रॉपर्टी सेटलमेंट आणि देण्या-घेण्यासंबंधी सर्व गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. दोघांचेही मुलं आता मोठी झाली आहेत. त्यामुळे कस्टडी केस किंवा आर्थिक रूपाने मुलांची काळजी याबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही.