Join us

Avengers- Endgame: ए. आर. रहेमानच्या ‘मार्वेल अँथम’ने केली चाहत्यांची निराशा! म्हटले ‘एप्रिल फुल’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 2:01 PM

मार्वेल स्टुडिओचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय.

ठळक मुद्दे‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचा अखेरचा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे.

मार्वेल स्टुडिओचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड सिनेमा याच महिन्यात २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केली. आता या चित्रपटाचे ‘अँथम साँग’ रिलीज झालेय. भारतीय प्रेक्षकांना खास भेट म्हणून मार्वेल स्टुडिओने ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’चे भारतीय अँथम रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. हे अँथम साँग बनवण्याची जबाबदारी सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक ए आर रहेमान यांच्यावर सोपवण्यात आली होती. साहजिकच भारताचा दिग्गज संगीतकार ए. आर. रहेमान याने बनवलेल्या या ‘अँथम साँग’कडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. पण हे काय? ‘अँथम साँग’ रिलीज झाले आणि चाहत्यांची निराशा झाली.

मार्वेलची सगळी पात्र या ‘मार्वेल अँथम’मध्ये आहेत. पण मिसिंग आहे ती केवळ ए. आर. रहेमानची ‘जादू’. होय, ‘मार्वेल अँथम’ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तरीच अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रोके ना रूकेंगे अब तो यारा...’ असे या ‘मार्वेल अँथम’चे बोल आहेत. काल १ एप्रिलला मार्वेल स्टुडिओने हे अँथम सॉन्ग प्रदर्शित केले. पण ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना याला ‘एप्रिल फुल’ म्हटले.

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’अ‍ॅव्हेंजर्स सीरिजचा अखेरचा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवणाऱ्या मार्वेल स्टुडिओने सध्या जगभर प्रमोशनचा धडाका चालवला आहे. भारतातही याचे जबरदस्त प्रमोशन सुरु आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ हिंदीसह तामिळ आणि तेलगू अशा दाक्षिणात्य भाषांतही प्रदर्शित होतोय. ‘गजनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ए आर मुरूगदास ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’च्या साऊथ व्हर्जनचे संवाद लिहित आहेत.

 

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेमए. आर. रहमान