Join us

‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ट चाइल्ड’ नाटकाविषयी पसरविलेल्या अफवांमुळे जे. के. रोलिंग संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 4:46 PM

हॅरी पॉटर पुस्तकाची लेखिका जे. के. रोलिंग हिने ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ड चाइल्ड’ सिनेमाच्या ट्रायलॉजी निर्मितीसंबंधीच्या चर्चा या ...

हॅरी पॉटर पुस्तकाची लेखिका जे. के. रोलिंग हिने ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ड चाइल्ड’ सिनेमाच्या ट्रायलॉजी निर्मितीसंबंधीच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. रोलिंगने ट्विटरवर अफवांचे खंडण करताना म्हटले की, ‘फॅँटास्टिक बिस्ट्स अ‍ॅण्ड व्हेअर टू फाइंड देम’ हा सिनेमा रिलिज होऊन केवळ दोनच महिने झाले अन् लगेचच हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ड चाइल्ड या सिनेमाच्या ट्रायलॉजीच्या अफवा पसरविल्या गेल्या; मात्र या निव्वळ अफवा असून, यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात थीम पार्क पत्रकार व इतिहासकार जीम हिल यांनी म्हटले होते की, हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ड चाइल्डवर आधारित सिनेमाचे ट्रायलॉजीवर काम सुरू आहे. ही बाब रोलिंगला कळताच तिने वेबसाइटवर म्हटले की, नाटकाचे सिनेमात रूपांतर करण्याची आम्ही कुठल्याही प्रकारची योजना बनविलेली नाही. मला नाही माहीत की, या अफवा कुठून पसरविण्यात आल्या. या त्वरित बंद केल्या जाव्यात, असे मला वाटते. कारण ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द क्रस्ड चाइल्ड’ हे एक नाटक असून, त्याचे लेखन नाटकाच्या स्वरूपातच केले गेले आहे. त्याची कादंबरी, सिनेमा किंवा कॉर्टून बनविण्याची आमची कुठल्याही प्रकारची योजना नाही. त्यामुळे अशा प्रकारची अफवा पसरवून मुख्य विषयाला फाटा देऊ नये. या स्वरूपाच्या अफवा त्वरित थांबविल्यास मला त्यादृष्टीने काम करता येईल, असेही रोलिंग यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर इतरांसाठी नाटकाची चेष्टा करण्यात काही लोकांना स्वारस्य वाटत असले तरी त्यांची ही कृती चुकीचे असल्याचेही तिने म्हटले आहे.