Join us

या अभिनेत्रीवर आईची हत्या केल्याचा आरोप, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 17:35 IST

आईची चाकूनं हत्या केल्याचा आरोप या अभिनेत्रीवर करण्यात आला आहे.

हॉलिवूडचा लोकप्रिय सिनेमा कॅप्टन अमेरिका द फर्स्ट एवेंजरमध्ये छोटीशी भूमिका साकारणारी अभिनेत्री मोली फिट्जराल्डवर आईची चाकूने हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३८ वर्षीय मोली फिट्जराल्डला ओलाथे येथून पोलिसांनी अटक केली आहे. सेकंड डिग्रीचा हत्या केल्याचा तिच्यावर आरोप असून ५००००० डॉलरच्या बॉण्डवर तिला तुरूंगवास झाला आहे. अद्याप आरोपी अभिनेत्रीने अद्याप कोणतेही स्टेटमेंट दिलेलं नाही. 

मोली फिट्जराल्डची ६८ वर्षीय आई पैट्रीसिया टीचे २० डिसेंबरला ओलाथेमधील त्यांच्या घरी शव सापडले. भलेही मोलीवर हत्येचा आरोप असला तरी अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. 

मोली फिट्जराल्डने २०१७ साली द क्रीप्ससारख्या कमी बजेटच्या सिनेमात काम केलं आहे. या चित्रपटाची ती निर्माती व दिग्दर्शिका होती. पैट्रीसियाचे कुटुंब त्यांच्या हत्येच्या वृत्तामुळे हादरले आहेत.

टॅग्स :हॉलिवूडगुन्हेगारी