Join us  

​जस्टिन बीबरसोबत न्यू इअर साजरा करायचा? मग साडे तीन कोटी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2016 5:23 PM

पॉप स्टार आणि ‘बेबी’ फेम जस्टिन बीबर कदाचित जगातील ‘मोस्ट ट्रोल्ड’ म्हणजे इंटरनेटवर सर्वाधिक जोक्स ज्याच्यावर केले जातात असा ...

पॉप स्टार आणि ‘बेबी’ फेम जस्टिन बीबर कदाचित जगातील ‘मोस्ट ट्रोल्ड’ म्हणजे इंटरनेटवर सर्वाधिक जोक्स ज्याच्यावर केले जातात असा सेलिब्रेटी आहे. म्हणून काय त्याची फॅन फॉलोविंग आणि क्रेझ कमी होते असे काही नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी आजही जगभरातील चाहते काहीही करण्यास तयार असतात.तर मग तुम्हीदेखील त्याचे असे ‘डाय हार्ड’ फॅन असाल तर त्याच्यासोबत यंदाचा न्यू इअर सेलिब्रेट करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. जस्टिन बरोबर नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच लाख डॉलर्स (सुमारे ३.३ कोटी रु) खर्च करावे लागतील. बस्स!त्याचा ‘न्यू इअर इव्ह’ कॉन्सर्ट मियामी येथे होतोय. जगातील सर्वात हॅपनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी यॉट, आलिशान गाड्या, पेंटहाऊस असा राजेशाही थाट असणार आहे. तुमच्या जीवनातील अविस्मरणीय न्यू इअर साजरा करण्यासाठी फक्त ‘द अल्टिमेट व्हीआयपी पॅकेज’ खरेदी करावे लागेल.                                                                 द अल्टिमेट व्हीआयपी पॅकेज : फॉन्टेनेब्ल्यू सार्रेन्टो पेंटहाऊस आणि स्पोर्टस् कारसुमोर साडेतीन कोटी रुपये किंमतीच्या या पॅकेजमध्ये तुम्हाला नऊ मित्रांसह पाच दिवस राहण्यासाठी फॉन्टेनेब्ल्यूच्या सार्रेन्टो पेंटहाऊसमध्ये, स्विमिंगपूल शेजारी कॅबाना, मोफत फाईव्ह स्टार डिनर आणि जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टचे एकदम समोरील तिकिटे मिळतील. त्याचबरोबर,- लॅम्बॉर्घिनी, फेरारी, रोल्स रॉईस, मॅक्लेरेन अशा स्पोर्टस् कारची मोफत सफर.- जस्टिनच्या कॉन्सर्टनंतर ‘एलआयव्ही’ येथे होणाऱ्या स्क्रिलेक्सच्या शोचे व्हीआयपी पासेस.- ‘स्टोरी’ नाईटक्लबसाठी यॉट चार्टर. तेथे मार्शमेलो परफॉर्म करणार आहे. त्याला वैयक्तिक भेटण्याची संधी.- प्रति बॉटल ४.३ लाख रु (६.५ हजार डॉलर्स) किंमतीची महागडी ‘अरमॅन्ड डी ब्रिग्नॅक ब्रुट गोल्ड’ शॅम्पेन.आणि एवढी मजा केल्यावर १ जानेवारीच्या हँग ओव्हरसाठी ब्लडी मेरी बार, इन-स्विट शेफ आणि दोन तासांची स्पा ट्रीटमेंटची सुविधा या पॅकेजमध्ये सामाविष्ट आहे.                                                    

via GIPHY

तर मग कसला विचार करताय? जायचा का न्यू इअर सेलिब्रेट करायला? जस्टिन बीबरचे फॅन्सचा तर प्रश्न नाही, पण जे नॉन-फॅन्स आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा काय न्यू इअर प्लॅन आम्हाला कळवा.