Join us  

गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या क्रिस्टीना ग्रिम्मीचे नवे गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 12:32 PM

गेल्या वर्षी जून महिन्यात फ्लोरिडा येथील ओरलॅँडो येथे आयोजित एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षकांना आॅटोग्राफ देताना एका माथेफिरूने गायिका क्रिस्टीना ...

गेल्या वर्षी जून महिन्यात फ्लोरिडा येथील ओरलॅँडो येथे आयोजित एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षकांना आॅटोग्राफ देताना एका माथेफिरूने गायिका क्रिस्टीना ग्रिम्मी हिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्त्या केली होती. ग्रिम्मीच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ महिन्यांनी तिच्या कुटुंबीयांकडून ग्रिम्मीने गायिलेले एक गीत रिलीज केले आहे.यूएस वीकलीने दिलेल्या माहितीनुसार क्रिस्टीना ग्रिम्मीच्या कुटुंबीयांनी ‘इनविजिबल’ हे नवे गीत रिलीज केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रिम्मीचा मोठा भाऊ मार्कस ‘एल्विस डूरान अ‍ॅण्ड द मॉर्निंग शो’मध्ये याचे गाण्याचा प्रीव्ह्यू सादर केला होता. यावेळी ग्रिम्मीच्या परिवाराकडून तिच्या स्मरणार्थ एक संस्था सुरू केली जाणार असल्याचेही घोषणा करण्यात आली.यावेळी मार्कसने बहीण क्रिस्टीना ग्रिम्मीच्या मृत्यूविषयी विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तरे दिलीत. गेल्या वर्षी जून महिन्यात लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ग्रिम्मीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या होत्या. त्या माथेफिरू व्यक्तीला जेव्हा अटक करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्याने स्वत:ला गोळी झाडली होती. जेव्हा ग्रिम्मीचा मृत्यू झाला तेव्हा तिचे वय केवळ २२ वर्ष इतके होते. ग्रिम्मीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून शोक व्यक्त केला होता. त्याचबरोबर कलाकारांच्या सुरक्षिततेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. ग्रिम्मीने गायिलेले हे नवे सॉँग आता रिलीज केले गेल्याने तिच्या आठवणींना एकप्रकारे उजाळा मिळाला आहे. ग्रिम्मीने अत्यंत कमी वयात स्वत:ला सिद्ध केले होते. तिच्या स्मरणार्थ आता एक संस्थाही सुरू केली जाणार आहे.