Join us  

Confirm : जस्टिन बीबर येणार भारतात! कधी व कुठे करणार परफॉर्म, वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 10:18 AM

गेल्या काही महिन्यांपासून ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विजेता पॉप स्टार जस्टिन बीबर भारतात येण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. येत्या मे ...

गेल्या काही महिन्यांपासून ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड विजेता पॉप स्टार जस्टिन बीबर भारतात येण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. येत्या मे महिन्याच्या १० तारखेला तो भारतात येणार असून, मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियममध्ये त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले जाणार आहे. या वृत्ताला दस्तुरखुद्द जस्टिन बीबर यानेच दुजोरा दिला असून, याबाबतचे त्याने एक ट्विटही केले आहे. व्हाइट फॉक्स इंडिया प्रमोट करीत असलेल्या या लाइव्ह कॉन्सर्टचे नाव ‘पर्पज वर्ल्ड टूर’ असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याचा हा इंडिया टूर त्याच्या चौथ्या अल्बमचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून जस्टिनच्या भारत टूरविषयी चर्चा रंगली होती. मात्र तो कधी येणार याची कोणाकडूनही अधिकृत माहिती दिली जात नव्हती, अखेर आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सूत्रानुसार बीबरच्या टूर्सची सर्वप्रथम देशातील मोठ्या उद्योगपती, बॉलिवूड, कॉर्पोरेट हाउस आणि स्पोर्ट्स वर्ल्डशी संबंधित लोकांना माहिती दिली होती. जेणेकरून ही सर्व मंडळी त्याच्या या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतील. खरं तर बीबरसाठी नेहमीच भारत ड्रीम डेस्टिनेशन राहिले आहे. त्याचे भारतात असलेल्या फॅन्सची संख्येविषयी तो जाणून आहे. त्यामुळे त्याला नेहमीच भारताची ओढ आहे. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने मुंबईला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. }}}} ">http://दरम्यान, या कॉन्सर्टसाठी आयोजकांकडून अतिशय हटके प्लॅनिंग केले जात आहे. या कॉन्टर्सला देसी टच देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून बीबरला भारतीय संस्कृती आणि येथील आटर््सविषयी जाणून घेता येईल. याविषयी व्हाइट फॉक्स इंडियाचे संचालक अर्जुन जैन यांनी सांगितले की, ज्यांनी कोणी बीबरचा ‘बिलिव्ह’ हा इंटरनॅशनल टूर बघितला असेल, त्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आमचा इव्हेंट कुठल्या लेव्हलचा असेल. आमची इच्छा आहे की, येत्या काळात भारतदेखील पॉप कॉन्सर्टसाठी खूप मोठे डेस्टिनेशन म्हणून जगासमोर यावे. बीबरच्या फॅन्सला बिलिबर्स नावाने ओळखले जाते. हे फॅन्स या कॉन्टर्स आॅनलाइन तिकीट खरेदी करू शकतात. येत्या २२ फेब्रुवारीपासून तिकीट विक्री सुरू होणार आहे. तिकिटाची किंमत चार हजार रुपयांपर्यंत असेल. आयोजकांना अपेक्षा आहे की, या इव्हेंटसाठी मुंबईसह बेंगळुरू, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथून फॅन्स मोठ्या संख्येने येतील. यावेळी बीबरने हिट लिस्टच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सला मॅसेज शेअर केला असून, त्यामध्ये आपली लवकरच भेट होणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विदेशी कलाकारांचा भारतात येण्याचा ओढा वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे कोल्ड प्ले रॉक बॅण्डच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. आता जस्टीन बीबरही येणार असल्याने त्याच्या चाहत्यांना त्याला जवळून परफॉर्म करताना बघण्याची संधी मिळणार आहे.