Join us

Corona Virusची लागण होऊ नये म्हणून या सेलिब्रेटीने केला असा पेहराव, ओळखणेही झाले अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:15 AM

जेम्स बाँड या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्कोला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

दिवसेंदिवस कोरोना सर्वत्रच उच्छाद मांडत आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वच सेलिब्रेटीमंडळी सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. बचावासाठी काय करावे काय करू नये यासाठी विविध उपाय सांगत असल्याचे पाहायला मिळतंय. अशातच गायिका एरिका बाडूने तर अनोखी शक्कलच लढवली आहे. सध्या मास्क लावत सेलिब्रेटी फिरताना पाहायला मिळतायेत. तर यांत एरिकाही सगळ्या सेलिब्रेटींमध्ये एक पाऊल पुढे आहे.

ती फक्त मास्क नाही तर तिने खास ड्रेसच तयार केला आहे. ‘हॅजमत सूट’ असे याला ओळखले जाते. डोक्यापासून तर पायापर्यंत या सूटने तिने संपूर्ण शरिर सुरक्षित केल्याचे पाहायला मिळत आहे. हे पाहायला थोडे अतरंगी वाटत असले तरी एरिका इतरांनाही अशाचप्रकारे सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे.

जेम्स बाँड या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्कोला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ओल्गाने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे. तिने तिच्या घराचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी गेल्या काही दिवसांपासून घरातच आहे. आठवडाभर मी आजारी असल्याने कोरोना व्हायरसची टेस्ट केली, त्यावेळी ही टेस्ट पॉझिटिव्ह आली.

आठवडाभर मी आजारी असल्याने कोरोना व्हायरसची टेस्ट केली, त्यावेळी ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. ताप आणि थकवा ही कोरोनाची दोन महत्त्वाची लक्षणं आहेत. तुमची तब्येत बरी नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका... तुमची काळजी घ्या.. असेही तिने म्हटले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या