Join us

Oscars 2023: ऑस्कर सोहळ्यातील दीपिकाचं भाषण ऐकून अभिमान वाटेल...! दोनदा अडखळली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 10:19 AM

Oscars 2023, Deepika Padukone: ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन दीपिका पदुकोणनं (Natu Natu) 'नाटू नाटू' या गाण्याची ओळख करून देत हॉलिवूडकरांचं लक्ष वेधलं. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Oscars 2023: यंदाचा ऑस्कर सोहळा तमाम भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला. होय, अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या वाट्याला दोन ऑस्कर आलेत आणि भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'नाटू नाटू' (Natu Natu) या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला. भारताच्या 'द एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मने देखील ऑस्कर पुरस्कार पटकावला. शिवाय या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं अभिनेत्री दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone )यंदा पहिल्यांदाच ऑस्कर सोहळ्याला हजेरी लावली. ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन तिनं (Natu Natu) 'नाटू नाटू' या गाण्याची ओळख करून देत हॉलिवूडकरांचं लक्ष वेधलं. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.दीपिकच्या चेहऱ्यावर दडपण होतं. पण डोळ्यांत होता तो देशाबद्दलचा अपार अभिमान. जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना काहीही चूक होऊ नये, याची काळजी दीपिकाने घेतली.

दीपिका दोनदा अडखळली पण...ऑस्करच्या मंचावर भाषण देताना दीपिका दोनदा अडखळली खरी...पण ती बोलत असताना समोरची गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत होती, तिचा प्रत्येक शब्द मनात साठवत होती. यामुळे दीपिकाना वारंवार थांबून थांबून बोलावं लागत होतं. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्याचा क्षण दीपिकासाठीही अभिमानाचा क्षण होता. त्याचा आनंद तिच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. दीपिकानं मोठ्या अभिमानानं राजामौलींच्या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याची ओळख करून दिली. यानंतर मागोमागच या गाण्यावरील परफॉर्मन्स सुरु झाला. काही मिनिटांच्या या सादरीकरणानंतर ऑस्करसाठी आलेल्या प्रत्येकानंच टाळ्यांचा कडकडाट करत या गाण्याला दाद दिली. याच गाण्याला ऑस्करमध्ये best original song या विभागात पुरस्कारही मिळाला. किरावानी यांनी ऑस्कर अवॉर्ड स्वीकारल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

 राजमौलीही भावुकआपल्या चित्रपटाला मिळालेला हा मान पाहताना खुद्द एस एस राजामौली देखील भावूक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजमौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटानं जगभर धुमाकूळ घातला होता. वर्ल्डवाईड या चित्रपटाने सुमारे 1100 कोटी रुपयांची कमाई केली. ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात अजय देवगन, आलिया भट आणि श्रिया सरण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

टॅग्स :दीपिका पादुकोणऑस्करआरआरआर सिनेमाएस.एस. राजमौली