Join us  

देव पटेलच्या ‘लायन’ला गोल्डन ग्लोबमध्ये चार नामांकने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 8:30 PM

आॅस्ट्रेलियन-अमेरिकन-ब्रिटिश ड्रामा असलेला ‘लायन’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दबदबा निर्माण केला आहे. अनेक पुरस्कारांची लयलूट करणाºया लायनला आता गोल्डन ...

आॅस्ट्रेलियन-अमेरिकन-ब्रिटिश ड्रामा असलेला ‘लायन’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दबदबा निर्माण केला आहे. अनेक पुरस्कारांची लयलूट करणाºया लायनला आता गोल्डन ग्लोबमध्ये तब्बल चार नामांकने मिळाली आहेत. ‘स्लमडॉग मिलेनेयर’ फेम अभिनेता देव पटेल याची चित्रपटात प्रमुख भूमिका असून, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी हा चित्रपट भारतात रिलिज होणार आहे. टोरंटो येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये लायनचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांसह, समीक्षकांनीदेखील चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. तसेच कलाकारांच्या अभिनयाला दादही दिली. चित्रपटात अभिनेत्री निकोल किडमन, देव पटेल, रूनी मारा यांच्यासह प्रियंका बोस, दीप्ती नवल, नवाजुद्दीन सिद्दीकी, तनिष्ठा चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची शूटिंग कोलकातासह आॅस्ट्रेलियात करण्यात आली आहे. लायन एक आॅस्ट्रेलियाई अमरिकी ब्रिटिश ड्रामा है जो २४ फरवरी २०१७ को भारत में रिलीज़ होने की तैयारी में है। इस फिल्म का टोरंटो अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव में प्रीमियर हुआ था। इस फिल्म में निकोल किडमन, देव पटेल, रूनी मारा है और इसमें प्रियंका बोस, दीप्ति नवल, नवाज़ुद्दीन सिद्दीकी और तनिष्ठा चटर्जी भी हैं और इसे कोलकाता के अलावा आॅस्ट्रेलिया में भी फिल्माया गया है।  चित्रपटाची कथा पाच वर्षांच्या भारतीय मुलाच्या अवती-भोवती फिरतेय. जो त्याच्या घरापासून हजारो किलोमीटर दूर कोलकात्याच्या रस्त्यांवर भटकत असतो. पुढे त्याला आॅस्ट्रेलियात एक दाम्पत्य दत्तक घेते. त्यामुळे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पुढे २५ वर्षांनंतर तो त्याच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी आॅस्ट्रेलियातून भारतात येतो. चित्रपटातील कलाकार प्रियंका बोसला याविषयी विचारले असता, तिने चित्रपटातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले. हा चित्रपट खरोखरच सन्मानाचा दावेदार आहे. ‘लायन’मध्ये काम करण्याची संधी मिळणे हे माझ्या दृष्टीने गौरवास्पद आहे. एक कलाकार या नात्याने अशा चित्रपटांचा भाग बनने खरोखरच अद्भुत आहे. गोल्डन ग्लोब या नामांकित अवॉर्ड्सबरोबरच जगातील प्रतिष्ठित समारंभांमध्ये चित्रपटाचे कौतुक होत असल्याने संपूर्ण टीम आनंदी आहे. आता भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. गोल्डन ग्लोबमध्ये मिळालेली नामांकने- सर्वश्रेष्ठ फिल्म - ड्रामा- सहायक भूमिका - सर्वश्रेष्ठ अभिनय (अभिनेता)- सहायक भूमिका - सर्वश्रेष्ठ अभिनय (अभिनेत्री)- सर्वश्रेष्ठ संगीत