Join us  

​‘रेप सिन’ विषयी नायिकेला सांगितलेच नव्हते; दिग्दर्शकाच्या खुलाशाने टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2016 8:55 PM

चित्रपटात दाखविले जाणारे रेप सिन्स सामान्यत: अभिनेत्रीच्या सहमतीने शूट केले जातात. मात्र १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘लास्ट टँगो इन ...

चित्रपटात दाखविले जाणारे रेप सिन्स सामान्यत: अभिनेत्रीच्या सहमतीने शूट केले जातात. मात्र १९७२ साली प्रदर्शित झालेल्या ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटातील रेप सिन हा अभिनेत्रीच्या परवाणगी शिवाय घेण्यात आला होता असे या चित्रपटाचे दिग्दर्शक बर्नार्डो बेतोर्लुची यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा हा चित्रपट वादात अडकला आहे. हा सिन रियालिस्टीक असावा यासाठी मी अभिनेत्रीला याबद्दलची माहिती दिली नव्हती असेही त्यानी सांगितले. ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटाताचे दिग्दर्शक बर्नार्डो बेतोर्लुची यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला. १९७२ साली प्रदर्शित ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटातील रेप सिन चांगलाच गाजला होता. दिग्दर्शक बर्नार्डो बेतोर्लुची यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडली आहे.  बर्नार्डो बेतोर्लुची म्हणाले, चित्रपटातील रेप सीन मारिया श्नायडर हीची सहमती न घेता शूट केला होता. आम्हाला हा सीन अधिक रियालिस्टीक बनवायचा होता यामुळे आम्हाला तसे करावे लागले होते. याबाबत मी अ‍ॅक्टर मार्लोन ब्रांडोबरोबर बोलने केले होते, मात्र त्यांनी याची माहिती मारियाला दिली नाही. असा सिन शूट होणार याची कल्पना देखील तिना नव्हती. आमची ही कल्पना भयंकर होती. पण याबाबत कोणताही पश्चाताप नाही, असेही ते म्हणाले. एका मुलाखतीमध्ये मारियाने ‘लास्ट टँगो इन पॅरिस’ या चित्रपटात तिचा रेप झाला नाही हे स्वीकारले, मात्र अनेक वर्षे मी स्वत:ला रेप व्हिक्टीमच समजत होते असे सांगितले होते. हा सीन ओरिजनल स्क्रीप्टमध्ये नव्हता. ही मर्लोनची आयडिया होती. आम्ही सीन शूट करायला गेलो तेव्हा त्याने मला सांगितले. मला रागही आला होता असेही मारियाने सांगितले होते. तेव्हाही हा चित्रपट असाच चर्चेत आला होता. मुलाखती दरम्यान बेतोर्लुची यांनी दिलेल्या जाहीर कबुलीनंतर लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लोकांनी ट्विटरवरून याविषयी आपला राग व्यक्त करीत त्यांच्यावर टीकेची झोड उडविली. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. ‘लास्ट टैंगो इन पॅरिस’ मध्ये एक व्यक्ती पत्नीच्या आत्महत्येनंतर अफेयर करतो. चित्रपटात रियल सेक्स आणि रेप दाखवल्याने लोकांना हा चित्रपट आल्यानंतर धक्का बसला होता. मारियाने चित्रपटात जीन नावाच्या तरुणीची भूमिका केली होती}}}}