Join us

प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन; बाथ टबमध्ये मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 08:02 IST

मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमागे कोणत्याही घातपाताचा संशय आलेला नाहीय, असे पोलिसांनी सांगितले. 

अमेरिकेतील प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे शनिवारी निधन झाले. ९० च्या दशकातील शो फ्रेंड्समुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले होते. ते ५४ वर्षांचे होते.

मॅथ्यू हे शनिवारी त्यांच्या लॉस अँजेलिसमधील त्यांच्या घरी बाथ टबमध्ये मृतावस्थेत आढळले. तिथून कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. टबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त लॉस अँजेलिस टाईम्स आणि टीएमझेड डॉट कॉम यांनी दिले आहे. 

मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमागे कोणत्याही घातपाताचा संशय आलेला नाहीय, असे पोलिसांनी सांगितले. 

मॅथ्यू पेरी यांचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी विल्यमस्टाउन, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते अगदी लहान वयात हॉलिवूडमध्ये आले होते. कारकिर्दीच्या सुरुवातीला काही छोट्या टीव्ही भूमिका केल्या होत्या. 1987 ते 1988 या कालावधीत 'बॉईज विल बी बॉईज' या शोमधील चेस रसेलची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. 1994 मध्ये सुरू झालेला फ्रेंड्स हा कॉमेडी शो त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.