मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या विरोधात सहसा सरकार कोणतंही टोकाचं पाऊल उचलत नाही. अशातच एका प्रसिद्ध गायकाला सरकार विरोधात गायलेलं गाणं चांगलंच भोवलंय. त्यामुळे सरकारने त्याच्याविरोधात कडक पाऊलं उचलली आहेत. हा गायक तुमाज सालेही. तुमाजला इराण सरकरने कडक शिक्षा सुनावली आहे. ३३ वर्षीय तुमाजला इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय.
मीडिया रिपोर्टनुसार, तुमाज सालेही इराणमधील प्रसिद्ध रॅपर आहे. त्याचा जन्म १९९० साली इराणमध्ये झाला. तुमाजने इराण सरकारची धोरणं आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात अनेक रॅप गाणी गायली. ही गोष्ट २०२२ ची जेव्हा इराण सरकारविरोधात आंदोलनं होत होती. आणि तुमाजने या आंदोलनाला पाठिंबा दिला. जेव्हा ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आली तेव्हा इराण सरकारने त्याला २०२३ मध्ये ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पुढे सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे तुमाजला जामिन मिळाला. परंतु आता ईराणमधील न्यायपालिकेच्या निर्णयानुसार तुमाजला दोषी ठरवलं असून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तुमाजचा गुन्हा नेमका काय?
२०२२ साली महासा आमिनी या महिलेचा मृत्यू इराणमध्ये झाला. त्यामुळे इराणमध्ये आंदोलनं सुरु होती. त्यादरम्यान या आंदोलनाला समर्थन देऊन खोटं पसरवून लोकांना भडकवण्याचं काम तुमाजने केलं, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. हिजाब परिधान करणाऱ्या महिलांच्या विरोधात आंदोलन पेटलं. आणि त्यावेळी तुमाजने या आंदोलनाला समर्थन देत सरकारच्या धोरणांवर टीका केली. परिणामी आता तुमाजला इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.