Join us  

प्रसिद्ध गीतकार कोहेन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 9:28 PM

प्रसिद्ध गायक तथा गीतकार लियोनार्ड कोहेन यांचे नुकतेच निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. कोहेन यांच्या ‘सोनी म्युझिक कनाडा’ ...

प्रसिद्ध गायक तथा गीतकार लियोनार्ड कोहेन यांचे नुकतेच निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. कोहेन यांच्या ‘सोनी म्युझिक कनाडा’ या फेसबुक पेजवरून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. मात्र याविषयी कुठल्याही विषयाची स्पष्टता केली गेली नाही की, त्यांचे निधन कुठल्या कारणाने अन् कधी झाले. दरम्यान फेसबुक पेजवरून सांगण्यात आलेल्या माहितीत म्हटले की, आम्हाला सांगताना खूपच वाइट वाटत आहे की, प्रसिद्ध कवी, गीतकार आणि कलाकार लियोनार्ड कोहेन यांचे निधन झाले आहे. आपण संगीत क्षेत्रातील सर्वात सन्माननीय आणि यशस्वी कलाकाराला मुकलो आहोत.  त्यांच्या स्मरणार्थ लॉस एंजिलिस येथे प्रार्थना सभा आयोजित केली जाणार आहे. त्यांच्या परिवाराकडून विनंती केली जाते की, त्यांच्या दु:खाच्या क्षणी सगळ्यांनी त्यांचे खासगी जीवन आणि सन्मान राखण्याचा प्रयत्न करावा. कोहेन यांनी त्यांचा शेवटचा अल्बम ‘यू वॉण्ट इट डार्क रे’ गेल्या महिन्यातच प्रदर्शित केला होता. त्यांनी त्यांच्या सहा दशकाच्या संगीत करिअरमध्ये ज्या पद्धतीचे गाणी लिहिली त्यावरून त्यांची तुलना प्रसिद्ध संगीतकार बॉब डायलन आणि पॉल सिमोन यांच्याशी केली जाते. कोहेन यांनी प्रेम आणि विश्वास, निराशा आणि उत्साह, एकटेपणा आणि जवळीकता, युद्ध आणि राजकारण यासारख्या विषयांवर गीते लिहिले आहेत. त्यांची गाणी आजही सर्वच वयोगटातील लोकांना आवडतात. त्यांच्या निधनाने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, आपण एका महान संगीतकाराचे स्मरण करायला हवे, अशाप्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. तसेच संगीत क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात असून, त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसून येत आहेत.