Join us

शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट; आता म्हणाली जोवर पैसे मिळत नाहीत, तोवर...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 6:21 PM

अमेरिकन अॅक्ट्रेस अमांडा सर्नीचे एक ट्विट रिट्वीट करत मिया खलीफाने म्हटले आहे, 'आपण तोवर ट्विट करणे सुरूच ठेऊ जोवर आपल्याला पैसे मिळत नाहीत.' मिया सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही ट्रोलर्स तिच्यावर पैसे घेऊन ट्विट केल्याचा आरोप करत आहेत. (Mia Khalifa)

नवी दिल्ली - लेबनानची अमेरिकन मीडिया पर्सनॅलिटी तथा पूर्वीची पोर्न स्टार मिया खलीफा (Mia Khalifa), ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही ट्रोलर्स तिच्यावर पैसे घेऊन ट्विट केल्याचा आरोप करत आहेत. याशिवाय शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या इतर सेलिब्रिटीजचा देखील विरोध करण्यात येत आहे. (Mia Khalifa again tweeted on Farmers protest this time said till the time we get the money)

मात्र, मिया खलीफावर या सर्व गोष्टींचा कसल्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नही. तसेच ती सातत्याने शेतकरी आंदोनाच्या समर्थनार्थ ट्विट करत आहे. तिने आपल्या एका ट्विटमध्ये निशाणासाधत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. जोवर आपल्याला पैसे मिळत नाहीत, तोवर आपण  ट्विट करतच राहणार, असे तिने म्हटले आहे. 

मिया खलीफाने अमेरिकन अॅक्ट्रेस अमांडा सर्नीचे एक ट्विट रिट्वीट करत हा निशाणा साधला आहे. मिया खलीफा प्रमाणेच अमांडा सर्नीनेही शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. यामुळे अमांडालाही सोशल मीडियावर निशाणा बनविले जात आहे. 

ट्रोलर्सना उत्तर देत अमांडाने ट्विट केले आहे, की 'हे केवळ तंग करण्यासाठी आहे. माझे अनेक प्रश्न आहेत... मला कोण पैसे देत आहे? मला किती पैसे मिळत आहेत? मी माझे इनव्हॉइस कुठे पाठवू? मला पैसे केव्हा मिळतील? मी बरेच ट्विट केले आहेत.... मला एक्स्ट्रा पैसे मिळतील का?' अमांडाच्या या ट्विटवर मिया खलीफाने रिप्लाई देत म्हटले आहे, 'आपण तोवर ट्विट करणे सुरूच ठेऊ जोवर आपल्याला पैसे मिळत नाहीत.'

टॅग्स :शेतकरी आंदोलनट्विटरपैसाअमेरिका