Join us

...अखेर जेम्स बॉण्डचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 4:52 PM

हॉलिवूडमधील सुपरस्टार अन् एकेकाळचा जेम्स बॉण्ड राहिलेला पीयर्स ब्रॉसनन गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या चांगल्याच स्मरणात आहे. जेम्स बॉण्डसारख्या महागड्या सीरिजमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल चारवेळा जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारा पीयर्स ब्रॉसनन चक्क एका पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला; मात्र पान मसाला तंबाखुजन्य पदार्थ असल्याने त्याच्या या जाहिरातीचा सोशल मीडियावर नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला. त्यातच सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनने या जाहिरातीवर बॅन लावल्याने चहुबाजूने अडकलेल्या पीयर्सने अखेर माफीनामा सादर करीत याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र पीयर्सचा हा माफीनामा म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असल्याचे बोलले जात आहे.

हॉलिवूडमधील सुपरस्टार अन् एकेकाळचा जेम्स बॉण्ड राहिलेला पीयर्स ब्रॉसनन गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या चांगल्याच स्मरणात आहे. जेम्स बॉण्डसारख्या महागड्या सीरिजमध्ये एक दोन नव्हे, तर तब्बल चारवेळा जेम्स बॉण्डची भूमिका साकारणारा पीयर्स ब्रॉसनन चक्क एका पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला; मात्र पान मसाला तंबाखुजन्य पदार्थ असल्याने त्याच्या या जाहिरातीचा सोशल मीडियावर नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला. त्यातच सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनने या जाहिरातीवर बॅन लावल्याने चहुबाजूने अडकलेल्या पीयर्सने अखेर माफीनामा सादर करीत याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र पीयर्सचा हा माफीनामा म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असल्याचे बोलले जात आहे. जाहिरातीबाबत वाढता रोष लक्षात घेऊन पीयर्सने म्हटले की, जाहिरातीत माझा फोटो वापरल्याने मी खूपच निराश झालो आहे. मला या प्रॉडक्टबाबत अजिबात माहिती नव्हती. हा पान मसाला खाल्ल्याने लोकांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार होईल याची मला कल्पना नव्हती. मी भारत आणि तेथील जनतेचा खूप आदर करतो. मला तेथील लोकांप्रती प्रेम आणि स्नेह असल्याचेही त्याने सांगितले. पुढे बोलताना तो म्हणाला की, माझे संपूर्ण आयुष्य महिलांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत मी समर्पण केले आहे. त्यामुळे मी कधीही अशा पदार्थांना बढावा देण्यासाठी संबंधित कंपनीशी करार केला नसता. मुळात जेव्हा मी या जाहिरातीचा करार केला तेव्हा कॉन्ट्रॅक्टरने असे सांगितले होते की, श्वास आणि दातांच्या शुद्धतेसाठीच्या जाहिरातीत तुम्हाला काम करायचे आहे. यात तंबाखुजन्य पदार्थांचा समावेश नसेल, हे मला अगोदरच स्पष्ट केले होते. त्यानंतरच मी या जाहिरातीत काम करण्याचा निर्णय घेतला होता.तसेच पीयर्स ब्रॉसननच्या प्रवक्त्यांकडूनदेखील याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले असून, त्यामध्ये पियर्स यांनी जाहिरातीचा करार करतानाच या पदार्थात तंबाखुजन्य पदार्थ नसतील हे स्पष्ट केले होते. हा पान मसाला पूर्णत: नैसर्गिक पदार्थांवर आधारित असेल, असे सांगितले होते. यावेळी पीयर्स यांच्या खासगी जीवनाचा दाखला देण्यात आला. त्यात पीयर्स यांची पहिली पत्नी, मुलगी आणि बºयाचशा मित्रांना कॅन्सरमुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे लोकांच्या दीर्घायुष्यासाठी पीयर्स ब्रॉसनन यांचा नेहमीच पुढाकार राहिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, यावेळी पीयर्स ब्रॉसनन यांनी कंपनीकडे जाहिरातीमधील त्याचा फोटो तातडीने काढण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच भारतीय जनतेला त्याने आश्वासन दिले की, त्याला या पदार्थाबाबत अजिबात माहिती नव्हती. भारतात या तंबाखुजन्य पदार्थाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटतील याचा त्याने कधी विचारही केला नव्हता, असेही त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले.