Join us

Sherika De Armas Died: प्रसिद्ध मॉडेलचं २६व्या वर्षी निधन, मिस वर्ल्डची होती स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:43 IST

वयाच्या अवघ्या २६ वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे.

सौंदर्यवती शेरिका डी अरमासचे निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या २६ वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. माजी मिस वर्ल्डची स्पर्धक असणाऱ्या शोरिका कन्सरशी झुंज देत होती. २६ वर्षीय शेरिकाचे १३ ऑक्टोबरला निधन झालंय. गेल्या काही वर्षांपासून ती कॅन्सरवर उपचार घेत होती, मात्र ती ही झुंज अपयशी ठरली आहे.  

शेरिका डी अरमासने २०१५ साली मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. चीनमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ती टॉप ३० मध्ये स्थान मिळवू शकली नव्हती. तरीही तिचे विशेष कौतुक झालेले, कारण त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अवघ्या १८ वर्षांच्या ६ सौंदर्यवतींपैकी एक शेरिका होती. होते. त्यावेळी नेटउरुग्वेला दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, "मला नेहमीच मॉडेल व्हायचे होते, मग ते ब्युटी मॉडेल असो, जाहिरात मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि मला वाटते सौंदर्य स्पर्धांमध्ये, मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. "

शेरिकाच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. तिचा भाऊ मायक डी अरमास याने सोशल मीडियावर अशी पोस्ट लिहिली आहे की, ''कायम उंच उडत राहा लहान बहिणी. मिस उरुग्वे २०२२ राहिलेली सौंदर्यवती कार्ला रोमेरोने शेरिकाला श्रद्धांजली वाहत लिहिले की, ''आतापर्यंत माझ्या आयुष्यात भेटलेल्या सगळ्यात सुंदर महिलांपैकी ती एक होती.'' 

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी