Join us

गेम ऑफ थ्रोन्सचे फॅन्स असाल तर ही बातमी नक्कीच वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 6:10 PM

गेम ऑफ थ्रोन्समधील या प्रसिद्ध अभिनेत्याने कोरोनावर मात केली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना ही गोष्ट सांगितली आहे.

ठळक मुद्देक्रिस्तोफर आता पूर्णपणे बरा झाला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्याने लगेचच उपचारांना सुरुवात केली होती. त्यामुळेच या आजारावर तो मात करू शकला.

गेम ऑफ थ्रोन्सचे सगळेच सिझन लोकांचे जीव की प्राण आहेत. या सिझनमधील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. पण गेम ऑफ थ्रोन्सचे चाहते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहेत. गेम ऑफ थ्रोन्समध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या क्रिस्तोफर हिव्ह्यूला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. पण आता त्याच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. 

क्रिस्तोफर आता पूर्णपणे बरा झाला असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्याने लगेचच उपचारांना सुरुवात केली होती. त्यामुळेच या आजारावर तो मात करू शकला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित सांगितले आहे की, कोरोनाची लागण मला झाली होती. तसेच बहुधा माझ्या पत्नीला देखील झाली होती. पण आता आम्ही दोघांनीही यावर मात केली आहे. आम्हाला लक्षणं जाणवल्यानंतर आम्ही लोकांमध्ये मिसळणे पूर्णपणे बंद केले होते. आमच्यात खूपच कमी प्रमाणात कोरोनाची लक्षणं होती हे आमचे भाग्यच मानावे लागेल. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागले आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल प्रत्येकाचे आभार... लोकांपासून दूर राहा, सतत हात धुवा हे मी माझ्या सगळ्या फॅन्सना नक्कीच सांगेन...

क्रिस्तोफरने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, मी सध्या नोर्वेमध्ये आहे... मी कोरोना व्हायरसची टेस्ट केली असून मला याची लागण झाली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून वेगळे घरात एकटे राहात आहे. माझी तब्येत आता सुधारत असून मला केवळ थोडीशी सर्दी आहे. पण जगात अनेक लोक आहेत, ज्यांना या व्हायरसमुळे प्रचंड त्रास होत आहे. मी लोकांना सांगेन की, त्यांनी आपली काळजी घ्यावी... सतत तुमचे हात धुवा... लोकांपासून कमीत कमी दीड मीटर दूर राहून बोला आणि जमेल तितके घरातच राहा...आपण सगळे मिळून हा व्हायरस अधिकाधिक पसरू नये यासाठी प्रयत्न करू शकतो... सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या आणि लोकांपासून दूर राहा... तुमच्यात या व्हायरसची लक्षणं आढळत असल्यास जवळच्या सेंटरमध्ये जाऊन लगेचच तपासणी करा...

टॅग्स :गेम ऑफ थ्रोन्सकोरोना वायरस बातम्या