Join us  

​ग्रॅमी अ‍ॅवॉर्डस् २०१७ : एडेल वि. बियोन्सेमध्ये कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2016 4:44 PM

संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी अ‍ॅवॉर्डस् २०१७’चे  नामांकन जाहीर झाले आहेत. या ५९ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये लोकप्रिय ...

संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘ग्रॅमी अ‍ॅवॉर्डस् २०१७’चे  नामांकन जाहीर झाले आहेत. या ५९ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये लोकप्रिय सिंगर एडेल आणि बियोन्सेमध्ये खरी स्पर्धा रंगणार असे दिसतेय.कारण या दोन्ही गायिकांना सर्वाधिक नामांकने मिळालेली असून आघाडीच्या सर्व कॅटेगरीमध्ये (बेस्ट अल्बम, रेकॉर्ड आणि साँग आॅफ द इयर) त्यांचा समावेश झाला आहे.एडेलचे अफाट प्रसिद्धी पावलेले तिच्या तिसऱ्या अल्बममधील ‘हॅलो’ गाणे आणि बियोन्सेच्या सहाव्या स्टुडिओ अल्बममधील ‘फॉर्मेशन’ गाण्यांचा दबादबा यावेळच्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये पाहायला मिळतोय.ग्रॅमी अ‍ॅवॉर्डस् २०१७एडेलच्या ‘२५’ अल्बमने सर्वाधिक विक्रीचा विक्रम नावे केला आहे तर बियोन्सेच्या ‘लेमोनेड’ अल्बममधील राजकीय थीम व दृश्यपरिणामकतेमुळे तो चर्चेत आहे.संपूर्ण नामांकनांचा विचार करता दोघी प्रत्येकी नऊ - नऊ नॉमिनेशन्ससह आघाडीवर असून त्यापाठोपाठ ड्रेक, रिहाना, कान्ये वेस्ट यांचा प्रत्येकी आठ नामांकनासह दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी ‘बेस्ट न्यू आर्टिस्ट ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड’ विजेती मेघन ट्रेनरला सर्वोत्कृ ष्ट नव गायिका, वर्षातील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड, वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे, वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम असे चार नामांकन मिळाले आहेत.पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ तारखेला लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळामध्ये जेम्स कॉर्डन होस्ट राहणार आहे.काही महत्त्वाची नामांकने :एडेलरेकॉर्ड आॅफ द इयर* हॅलो - एडेल* फॉर्मेशन - बियॉन्से* ७ इयर्स - ल्युकास ग्रॅहम* वर्क - रिहाना* स्ट्रेसड् आऊट - ट्वेंटी वन पायलटस्
बियॉन्सेअल्बम आॅफ द इयर* २५  - एडेल* लेमोनेड - बियॉन्से* पर्पज - जस्टिन बीबर* व्ह्युव्ज - ड्रेक* अ सेलर्स गाईड टू अर्थ - स्टर्गिल सिम्पसन
जस्टिन बीबरसाँग आॅफ द इयर* हॅलो - एडेल* फॉर्मेशन - बियॉन्से* आय टूक अ पिल इन इबिजा -  माईक पॉस्नर* लव्ह युवरसेल्फ - जस्टिन बीबर* ७ इयर्स - ल्युकास ग्रॅहम
अँडरसन.पाक​बेस्ट न्यू आर्टिस्ट* केल्सिया बॅलेरिनी* द चेनस्मोकर्स* चान्स द रॅपर* मेरेन मॉरिस* अँडरसन.पाक