Harry Potter Actor Sir Michael Gambon Dies: प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या ‘हॅरी पॉटर’ या सिनेमातील एका कलाकाराचे निधन झाले आहे. ‘प्रोफेसर डंबलडोर’ही साकारलेली भूमिका गाजली होती. या कलाकाराचे नाव सर मायकल गँबोन असे आहे. मायकल यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मायकल यांना निमोनियाचा आजार झाला होता. मायकल यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर मायकल यांची प्राणज्योत मालवली.
मायकल यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात असून, हॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. मायकल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. डबलिन येथे मायकल यांचा जन्म झाला होता. हॉलिवूडमध्ये ६ दशकांपेक्षा अधिक काळ त्यांची कारकीर्द गाजली. मायकल यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
हॅरी पॉटर सिनेमाच्या सहा भागांमध्ये साकारली प्रोफेसरची भूमिका
हॅरी पॉटर सिनेमांच्या सीरिजसह मायकल यांनी टीव्ही, रेडिओ आणि अन्य सिनेमांमध्ये काम केले होते. हॅरी पॉटर सिनेमा सीरीजमधील ६ भागांमध्ये त्यांनी प्रोफेसर डंबरडोर अशी भूमिका साकारली होती. ही भूमिका महत्त्वाची मानली गेली. तसेच या भूमिकेसाठी मायकल यांना प्रेक्षकांचे खूप प्रेम, लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली, असे सांगितले जाते. सन २०१२ मध्ये Samuel Beckett यांच्या All That Fall या नाटकात मायकल यांनी अखेरची भूमिका साकारली होती.
दरम्यान, मायकल लहान असतानाच त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. १९६२ रोजी आयरलँड येथे मायकल यांनी आपला पहिला स्टेज शो केला होता.