प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचीनो काही महिन्यांपूर्वीच चौथ्यांदा बाबा झाला. ८३व्या वर्षी बाबा झाल्याने अल पचीने चर्चेत होता. अली पचीनो याची २९ वर्षीय गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह हिने जून महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यांना पूत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. परंतु, बाळाच्या जन्मानंतर तीनच महिन्यात ते विभक्त झाले. आता अल पचीनोला मुलाचा सांभाळ करण्यासाठी गर्लफ्रेंडला दर महिना ३० डॉलर म्हणजेच २५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार नूरने सप्टेबर महिन्यात मुलाच्या कस्टडीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात अल पचीनो आणि नूरने सामंजस्याने याबाबत निर्णय घेतला होता. यानुसार नूरकडे मुलाची कस्टडी राहणार होती. आता अल पचीनोला मुलाचे पालन पोषण, शिक्षण आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी दरमहा नूरला ३० हजार डॉलर द्यावे लागणार आहेत. अल पचीनोने गर्लफ्रेंडला १ लाख १९ हजार डॉलर आधीच अॅडव्हान्समध्ये दिले आहेत. त्याबरोबरच अल पचीनो वर्षाच्या शेवटी त्याच्या कमाईनुसार आणखी ९० हजार डॉलरही गर्लफ्रेंडला देऊ शकतो.
मुलाच्या शिक्षणाबरोबरचा त्याच्या मेडिकलच्या खर्चाचा भारही अल पचीनोला उचलावा लागणार आहे. दरवर्षी लेकाच्या शिक्षणासाठी पचीनो १५ हजार डॉलर द्यावे लागणार आहेत. त्याबरोबरच मुलाच्या आजारपणाचा संपूर्ण खर्चही पचीनोला करावा लागणार आहे. एप्रिल २०२२मध्ये अल पचीनो आणि नूर यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ६ जून २०२३ला नूरने रोमन या त्यांच्या मुलाला जन्म दिला. आता नूरकडे रोमनची कस्टडी आहे आणि पचीनोला मुलाला भेटण्याची अनुमती देण्यात आली आहे.