Join us

८०व्या वर्षी सातव्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणतो - या वयात वडील होणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:36 PM

८०व्या वर्षी बाबा झाल्यानंतर अभिनेता भावुक, लेकीबद्दल म्हणाला, "मला तिच्याबरोबर..."

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो त्यांच्या अभिनयासाठी ओळखला जातात. गेली जवळपास ५० दशकांहून अधिक काळ ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. 'द गॉड फादर २', 'द इंटर्न', 'जोकर', 'कसिनो' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत त्यांनी दोन ऑस्कर पुरस्कार नावावर केले. पण, अभिनयातील करिअरपेक्षा रॉबर्ट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असतात. ८० वर्षांचे रॉबर्ट आता सातव्यांदा बाबा झाल्यामुळे चर्चेत आले आहेत. 

मे २०२३ मध्ये रॉबर्ट सातव्यांदा बाबा झाले. त्यांची गर्लफ्रेंड टिफनी चेनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रॉबर्ट आणि टिफनी यांनी लेकीचं नाव जिया असं ठेवलं आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाच रॉबर्ट यांनी ८०व्या वर्षी बाबा होण्याचा आनंद एका मुलाखतीत व्यक्त केला आहे. "जेव्हा मी तिच्याकडे पाहतो तेव्हा मी कुठल्याही कामात व्यग्र असेन किंवा कोणत्या गोष्टीची काळजी करत असेन तर ती दूर होतो. ती खूप गोड आहे. जेव्हा मी तिला पाहतो तेव्हा मी हरवून जातो. मोठी झाल्यावर ती कुठे जाईल हे माहीत नाही. पण, ती हे सर्वकाही पाहत आहे. मी ८० वर्षांचा बाबा आहे आणि हे खूप छान आहे. मला तिच्याबरोबर जेवढं शक्य आहे तितका वेळ घालवायचा आहे," असं रॉबर्ट म्हणाले. 

रॉबर्ट यांना जिया व्यतिरिक्त अन्य सहा मुले आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांना ड्रिना आणि राफेल ही मुले आहेत. तर दुसरी पत्नी ग्रेस हिच्यापासूनही त्यांना इलिट आणि हेलेन ही दोन मुले आहेत. एक्स गर्लफ्रेंड टुकी स्मिथपासून रॉबर्ट यांना ज्युलियन आणि आरोन ही जुळी मुले झाली होती. आता टिफनी या गर्लफ्रेंडपासून त्यांना जिया ही मुलगी झाली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीहॉलिवूड