मेडिकल ड्रामा सिरीज ‘ईआर’ मुळे चर्चेत आलेली हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केज हिला चौकशीसाठी आलेल्या पोलिसांशी नडणे जीवावर बेतले. होय, चौकशीसाठी आलेल्या पोलिसांवर वेनेसाने खेळण्यातील बंदूक रोखली आणि पोलिसांनी ती खरी समजून गोळीबार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.गुरूवारी ही घटना घडल़ी वेनेसाची प्रकृती बरी नव्हती. तिच्या प्रकृतीच्या चिंतेतून घरमालकाने पोलिसांना सूचना केली. यानंतर काहीचं मिनिटांत पोलिस वेनेसाच्या पॅसेडेना येथील निवासस्थानी पोहोचले. पोलिसांना समोर पाहून वेनेसाने हुबेहुब खरी दिसणारी खेळण्यातली बंदूक अर्थात टॉय गन पोलिसांवर रोखली होती. ही बंदूक खरी समजून गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला.
हॉलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजने रोखली ‘टॉय गन’! पोलिसांनी खरोखरचं झाडली गोळी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 10:37 IST