ठळक मुद्देबेलाने दाखवलेल्या या हिंमतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बेलाच्या ट्विटला ३२ हजारांवर लोकांनी रिट्विट केले आहे.
ऑनलाईन उपलब्ध असलेला खासगी डाटा हॅक करून न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्याची धमकी देणा-याविरोधात एखादी व्यक्ती काय करेल? अलीकडे अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्न हिच्यासोबत नेमके हेच घडले. एका हॅकरने बेलाचे अकाऊंट हॅक करून तिचे न्यूड फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पण या धमकीनंतर बेलाने काय करावे? तर तिने स्वत:च स्वत:चे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले.हॅकरचा मला ब्लॅकमेल करण्याचे सगळे मनसुबे मी ध्वस्त केलेत. मी स्वत:च स्वत:चे न्यूड फोटो शेअर केलेत. माझे आयुष्य तू नियंत्रित करू शकत नाही,’ असे बेलाने स्वत:चे न्यूड फोटो शेअर करताना लिहिले. बेलाने १५ जूनला हे ट्विट केले आहे. यात तिने तीन स्क्रिन शॉट्स शेअर केलेत. तिचा चेहरा यात स्पष्ट दिसतोय.
यानंतर लिहिलेल्या पोस्टमध्ये बेलाने सांगितले की, २४ तासांसाठी माझे अकाऊंट हॅक झाले होते. मला माझेच न्यूड फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. त्या हॅकरने मला आणखी काही सेलिब्रिटीचे न्यूड फोटोही पाठवले. मी घाबरले होते. अनेक दिवस त्याच्या धमक्या सहन केला. त्याचा त्रास सहन केला. पण एका क्षणाला मी या सर्वाला वैतागले. तो मलाच ब्लॅकमेल करून थांबणार नाही तर तो यापुढे अशा अनेकांना ब्लॅकमेल करेल, हे मला कळून चुकले आणि मी स्वत:च स्वत:चे न्यूड फोटो शेअर करण्याचा निर्णय घेतला. आता तुला माझ्याकडून काहीच मिळणार नाही. आता मी शांततेत झोपू शकेल. माझ्यातील सर्व शक्ती मी परत मिळवली, असे बेलाने लिहिले.
तूर्तास बेलाने दाखवलेल्या या हिंमतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बेलाच्या ट्विटला ३२ हजारांवर लोकांनी रिट्विट केले आहे. यापुढे कोणताही हॅकर सेलिब्रिटींना ब्लॅकमेल करू शकणार नाही. कारण सेलिब्रिटीही या ब्लॅकमेलिंगचे परखड उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया यानंतर उमटत आहेत.