Tiatanic Floating Door : १९९७ मध्ये टायटॅनिक हा हॉलिवूडसिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियो आणि केट विंसलेट या कलाकांराना रातोरात स्टार बनवलं. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर या सिनेमाची दखल देखील घेण्यात आली. जेम्स कैमरून दिग्दर्शित टायटॅनिक या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. तब्बल २६ वर्ष उलटूनही हा सिनेमा अजुनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण सध्या या चित्रपटापेक्षा त्यामधील एका लाकडी दरवाज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
या चित्रपटाच्या शेवटच्या भागात टायटॅनिक जहाज डुबतं. त्यातील एका सीनमध्ये अभिनेत्री केट विंसलेटला म्हणजे रोजला तिचा प्रियकर जॅक तिचा जीव वाचण्यासाठी एका दरवाज्याचा आधार घेताना दाखवण्यात आलंय. या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये दाखवण्यात आलेल्या या दरवाज्याचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. जवळपास ५ कोटी ९९ लाख रूपये इतकी विक्रमी बोली या दरवाज्यासाठी लावण्यात आली आहे.
द हॉलिवूडने दिलेल्या माहितीनूसार, लिलावा दरम्यान अनेकांना हा दरवाजा एक लाकडाचा तुटलेला भाग आहे असं वाटलं होतं. परंतु, हेरिटेज ऑक्शननूसार हा टायटॅनिक जहाजाच्या अपघातावेळी रोजचे प्राण ज्यामुळे वाचले त्या दरवाजाचा हा भाग आहे, ज्याची कालांतराने झिज झाली.
असं आहे चित्रपटाच कथानक -
१९ व्या शतकातील सर्वात मोठं जहाज अशी टायटॅनिक जहाजाची ख्याती होती. समुद्रात कधीही नं बुडणारं जहाज असा दावा या जहाजाबद्दल करण्यात आला होता. साधारणत: १० एप्रिल १९१२ या दिवशी ब्रिटनच्या साउथॅम्पटन बंदरातून रवाना झालेलं हे जहाज त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहचण्याआधी त्याचा अपघात होतो. या अपघातात जहाजातील १ हजार ५१३ जणांचा आपला जीव गमावला यावर सिनेमाचं कथानक आधारलेलं आहे.