Join us  

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ३८व्या वर्षी चौथ्यांदा झाली आई; मुलीचं नाव ठेवलं 'ओरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 2:56 PM

हॉलिवूडची 'वंडर वुमेन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गॅल गॅडोट तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.

Gal Gadot : हॉलिवूडची 'वंडर वुमेन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गॅल गॅडोट तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. ३८ वर्षीय गॅल गॅडोट चौथ्यांदा आई झाली आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. गॅल गॅडोटने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 'वंडर वुमन' फेम अभिनेत्रीने ६ मार्च रोजी तिच्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गॅलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं हॉस्पिटलच्या बेडवर आपल्या मुलीला मीठीत घेतलं आहे. शिवाय त्यामार्फत गॅलनं तिच्या मुलीच्या नावाची देखील माहिती दिली आहे. गॅलनं तिच्या मुलीचं नाव 'ओरी' असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ हिब्रूमध्ये प्रकाश असा होतो.

अभिनेत्रीनं नवरा यारोन वर्सोनासोबत आपल्या कुटुंबामध्ये नव्या पाहुणींच स्वागत केलं. २००८ मध्ये गॅडोटचं लग्न इस्रायली रिअल इस्टेट डेव्हलपर यारॉन वर्सानोशी झालं. या जोडप्याला आधीच तीन अपत्य आहेत. आता त्यांच्या घरी चौथ्यांदा आनंदाची बातमी आली आहे.

"माझ्या प्रिय मुली, तुझं खूप स्वागत आहे. तू आमच्या जीवनात खूप प्रकाश आणला आहेस, या मुलींच्या घरात तुझं मनापासून स्वागत आहे. तुझे डॅडी खूप कूल आहेत." गॅलनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतं आहे. 

अभिनेत्री गॅल गॅडोट 'वंडर वुमन' या चित्रपटामध्ये काम करत  प्रकाशझोतात आली . फास्ट अँड फ्युरियस-6, डेट नाईट, रेड नोटिस, हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलं आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत झळकली  होती.

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी