Join us

अद्यापही समजू शकला नसला ‘कोरोना’चा धोका  तर हे सिनेमे बघा, भीतीने उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 8:00 AM

कोरोनासारखे व्हायरस मानवी जीवनासाठी किती धोकादायक आहे, याचा अंदाज हे सिनेमे पाहिल्यानंतर यावा.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढतेय. देशातही कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय. मात्र अद्यापही भारतातील लोक कोरोनाला हलक्यात घेत असल्याचे चित्र आहे. घरातून बाहेर पडू नका असे आवाहन सरकारने केले असले तरी लोक रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. एकंदर काय, तर अद्यापही कोरोना व्हायरसला लोक गंभीरपणे घ्यायला तयार नाहीयेत. तुम्हीही यापैकीच एक असाल तर या स्थितीचे गांभीर्य दाखवणारे हे सिनेमे तुम्ही एकदा पाहाच. होय, कोरोनासारखे व्हायरस मानवी जीवनासाठी किती धोकादायक आहे, याचा अंदाज हे सिनेमे पाहिल्यानंतर यावा.

कंटेजन

स्टीवन सोडरबर्गचा ही मेडिकल थ्रीलर ड्रामा सीरिज 2011  रिलीज झाली होती. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही सीरिज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. यातही एका रात्रीत जगभर पसरणाºया व्हायरसबद्दल दाखवले आहे. ही सीरिज सध्या अ‍ॅमेझॉन प्राईमवर तुम्ही पाहू शकता.

 द क्रेजीज

जॉर्ज ए. रोमेरोचा हा सिनेमा संक्रमित आजारांबद्दल आाहे.  जैविक हत्यारे घेऊन जाणारे मिल्ट्रीचे एक प्लेन अमेरिकेजवळच्या एका शहरात कोसळले आणि यामुळे या भागातील पाणी पुरवठा दूषित होतो. लोक मरायला लागतात. सरकार या आजारापासून वाचण्यासाठी लोकांना बघताक्षणी गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश देते, अशी याची कथा आहे.

द हॉट जोन

द हॉट जोन नावाची ही टीव्ही सीरिज गतवर्षी रिलीज झाली होती. 6 एपिसोडची ही सीरिज एक मेडिकल ड्रामा आहे. यात इबोला व्हायरसशी लढणा-या एका शास्त्रज्ञाची  कथा आहे. संवेदशनशील काळात काम करताना संस्था-संस्थांमधील अंतर्गत वाद अशा आजारांना थांबवत नाही तर वाढवतो, अशी याची थीम आहे.

आऊटब्रेक

हा सिनेमा मोटाबा नावाच्या काल्पनिक आजाराबद्दल् आहे. संपूर्ण कॅलिफोर्नियात हा आजार पसरतो. स्मगलिंगद्वारे देशात आणल्या गेलेल्या संक्रमित माकडांपासून हा आजार पसरतो आणि याच्याशी निपटण्यासाठी सरकार मार्शल लॉ लागू करतो, अशी याची ढोबळ कथा आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज उपलब्ध आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहॉलिवूड