बेट जेन कोहनचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 8:17 PM
‘द स्पिरिट इन आर्केटेक्चर : जॉन लांटनेर’ या डॉक्यूमेंटरीचे दिग्दर्शक बेट जेन कोहेन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एका ...
‘द स्पिरिट इन आर्केटेक्चर : जॉन लांटनेर’ या डॉक्यूमेंटरीचे दिग्दर्शक बेट जेन कोहेन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार बेट जेन कोहेन यांचे गेल्या बुधवारी निधन झाले. १९९० मध्ये आलेल्या ‘द स्पिरिट इन आर्केटेक्चर : जॉन लांटनेर’ या डॉक्यूमेंटरीमध्ये लॉस एंजेलिसचे लोकप्रिय आर्किटेक्ट लांटनेर यांची मुलाखत दाखविण्यात आली आहे. या मुलाखतीत त्यांच्या कामाची पद्धत दाखविण्यात आली होती. नुकताच कोहेनने या डॉक्यूमेंटरीला २५ वर्ष पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशनदेखील केले होते. त्या स्वित्झरलॅँड येथे आर्किटेक्ट एल्बर्ट फ्रेके यांच्यावर आधारित एका डॉक्यूमेंटरीसाठी काम करीत होत्या. मात्र मध्येच दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी ‘मेटेओर’, ‘लेडी इन व्हाइट’, ‘द इनक्रीडेबल श्रींकिंग वुमन’ आणि ‘अंडर द चॅरी मून’ यासारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. कोहेन यांच्या परिवारात पती स्टीवन जेतजेव, मुलगा जॅकब, आई-वडील आणि भाऊ आहे. कोहेनच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.