Join us

या अभिनेत्रीला झाली कोरोना व्हायरसची लागण, सोशल मीडियाद्वारे तिनेच दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:28 PM

कोरोना व्हायरसमुळे ही अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून घरातून बाहेर पडलेली नाहीये.

ठळक मुद्देओल्गाने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे. तिने तिच्या घराचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी गेल्या काही दिवसांपासून घरातच आहे. आठवडाभर मी आजारी असल्याने कोरोना व्हायरसची टेस्ट केली, त्यावेळी ही टेस्ट पॉझिटिव्ह आली.

जेम्स बाँड या चित्रपटामुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री ओल्गा कुरीलेन्कोला कोरोना व्हायरसची लागण झाली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

ओल्गाने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे. तिने तिच्या घराचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी गेल्या काही दिवसांपासून घरातच आहे. आठवडाभर मी आजारी असल्याने कोरोना व्हायरसची टेस्ट केली, त्यावेळी ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. ताप आणि थकवा ही कोरोनाची दोन महत्त्वाची लक्षणं आहेत. तुमची तब्येत बरी नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका... तुमची काळजी घ्या...

ओल्गा ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असून जेम्स बाँडच्या 2008 प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ती झळकली होती. तसेच ऑव्लिवियन या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. 

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या