Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ या सिनेमाच्या वर्ल्डवाईड कमाईबद्दल विचारूच नका. या सिनेमानं जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. होय, सिनेमाचं वर्ल्डवाईड कलेक्शन 1 बिलियन डॉलरवर पोहोचलं आहे. भारतातही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मंगळवारपर्यंत या सिनेमाने वर्ल्डवाईड 1.03 बिलियन डॉलर कमावले आहेत. जेम्स कॅमेरूनच्या या चित्रपटाने १४ दिवसांत मोठा टप्पा पार केला आहे.
1 बिलियनचा आकडा इतक्या झटपट गाठणारा ‘अवतार 2’ हा सहावा सिनेमा आहे. 1.03 बिलियनचा डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयानुसार 82 अब्ज 84 कोटी 95 लाखांपेक्षा जास्त आहेत. जबरदस्त व्हीएफएक्सने खिळवून ठेवणाऱ्या ‘अवतार 2’ने रिलीजच्या 12 व्या दिवशीही शानदार कमाई केली. 16 डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने भारतात सर्व भाषेत 274.95 कोटींचा बिझनेस केला आहे. या चित्रपटाने फक्त हिंदी भाषेत 88.22 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट ज्या वेगाने बिझनेस करतो आहे, ते पाहता जेम्स कॅमेरून पुन्हा एकदा आपल्याच अवताराचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स आफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं.
आणखीही पार्ट येणार...‘अवतार 2’ रिलीज झालाये. त्याचबरोबर ‘अवतार 3’ चं शूटिंगही जवळपास संपलं आहे. ‘अवतार 3’ साठी 20 डिसेंबर 2024 चा स्लॉट निश्चित करण्यात आला आहे. यानंतर ‘अवतार 4’ डिसेंबर 2026 आणि ‘अवतार 5’ डिसेंबर 2028 ला रिलीज होणे अपेक्षित आहे.