सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका व अभिनेत्री जेनिफर लोपेजने बेसबॉलचा निवृत्त खेळाडू एलेक्स रोड्रिगेजसोबत साखरपुडा केला. जेनिफर व एलेक्स गत दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षांच्या डेटनंतर दोघांनीही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गत शनिवारी हा साखरपुडा पार पडला. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल पण जेनिफरचा हा सहावा साखरपुडा आहे.
जेनिफर लोपेज ही अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माता आहे. इन लिव्हिंग कलर टेलिव्हिजन कॉमेडी शोमधून डान्सर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९९ मध्ये तिने आपला पहिला स्टुडिओ अल्बम रिलीज केला.