Join us

'पाइरेट्स ऑफ द कैरेबियन' फेम जॉनी डेपच्या बाजूनं कोर्टाचा निकाल, एम्बर देणार इतक्या कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 10:27 AM

Johnny Depp: सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालानंतर जॉनी डेपच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेता जॉनी डेप(Johnny Depp)च्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड(Amber Heard)च्या विरोधात जॉनी डेपने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केल्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा निकाल जॉनी डेपच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रुपये द्यावे लागणार आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने याचा निकाल दिला आहे. याप्रकरणी प्रदीर्घ चर्चा, साक्ष आणि अनेक पुरावाच्या विचार विनमयानंतर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली.

सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार,अम्बर हर्डला १० मिलियन डॉलर म्हणजेच ७७ कोटी रुपये हे नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. तर ५ मिलियन डॉलर ३८ कोटी रुपये ही दंडात्मक नुकसान म्हणून भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या निकालात अम्बरने माझी बदनामी केली हे सिद्ध करण्यात जॉनी डेप यशस्वी ठरला असल्याचे ज्युरीने आपल्या निकालात म्हटले आहे.

सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालानंतर जॉनी डेपच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जॉनी डेपचे अनेक चाहते हे मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमा झाले आहेत. अनेकांनी या निकालानंतर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे. जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यातील हायप्रोफाइल कायदेशीर लढाईदरम्यान गेल्या सहा आठवड्यांपासून अनेक साक्षीदारांचे जबाब ज्यूरीसमोर नोंदवले गेले. गेल्या सहा आठवड्यात शंभरहून जास्त साक्षीदार होते. दीर्घ साक्ष आणि वादविवाद झाल्यानंतर ज्युरीने जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला आहे.

घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले होते. २०१८ मध्ये एम्बर हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये तिने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले होते. एम्बरने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याला उद्देशून बोलल्याचे जॉनी डेपला जाणवले आणि त्याने एम्बरवर मानहानीचा खटला दाखल केला.