Join us  

​न्यायाधिशाने फेटाळली ब्रॅड पिटची कस्टडी रिक्वेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2016 5:55 PM

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटाचे प्रकरण थंड होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आता कुठे दोघांमध्ये मुलांच्या ताब्यावर ...

ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटाचे प्रकरण थंड होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आता कुठे दोघांमध्ये मुलांच्या ताब्यावर सहमती बनली होती की, ब्रॅडने मुलांना अधिक वेळा भेटण्यासाठी प्रयत्न सुरू केले.ब्रॅडने स्पेशल कोर्टात याचिका केली की, मुलांच्या कस्टडीबाबत न्यायालयीन प्रकरणातील सर्व प्रक्रिया सील करण्यात यावी. मुलांची अधिक काळ कस्टडी मिळवण्याचा तो प्रयत्न करत असल्यामुळे न्यायाधिशाने याचिका फे टाळून ब्रॅडला जबर धक्का दिला.आठवड्यातून किमान दोनदा तरी भेटता यावे म्हणून ब्रॅड प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्याने एमर्जन्सी सुनवाणीतील न्यायाधिशाला डॉक्युमेंट सील करण्याची विनंती केली. लॉस एंजिलिस सुपिरिअर कोर्ट जज रिचर्ड जे. बर्ज ज्यूनिअर यांनी सील करण्यासाठी लागण्याऱ्या अर्टीची पूर्तता न करण्याच्या कारणावरून ब्रॅडचा अर्ज फेटाळला.द जोल-पिटस् : ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली मुलांसमवेतविशेष म्हणजे वेगळे होण्याच्या निर्णयानंतर मुलांच्या कस्टडीवरून ब्रँजेलिनामध्ये टस्सल सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये याविषयी झालेला करार जाहीर करण्यात आला आणि त्यानंतरही ब्रॅडने मुलांना अधिक वेळा भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले.पूर्व करारानुसार केवळ थेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली ब्रॅड मुलांना भेटू शकतो. पण एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही. मुलांचा तात्पुरता ताबा मिळवण्याबरोबरच या प्रकरणाशी निगडीत सर्व कागदपत्रे मुलांचे खासगीपण जपण्याकरिता सीलबंद करण्यात यावे म्हणून तो प्रयत्नशील आहे.त्याच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तो म्हणतो की, ‘या प्रकरणातील डॉक्युमेंट सार्वजनिक झाल्यास मुलांच्या वैयक्तिक हक्कांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ते सीलबंद करण्यात यावेत अशी मी विनंती करतो.’ परंतु न्यायाधिशाने त्यांची विनंती नाकरली.सप्टेंबर महिन्यात अँजेलिना जोलीने ब्रॅडपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोटासाठी पेपर दाखल केले. सुमारे १२ वर्षे रिलेशनशिप आणि दोन वर्षांच्या लग्नानंतर दोघांनी फारकत घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला. त्यांना दत्तक व स्वत:ची मिळून सहा मुले आहेत.