काही दिवसांपूर्वी लंडनमधील एका कोर्टाने हॉलिवूडची सिंगर केटी प्राइस हिला दिवाळखोर म्हणून जाहीर केलं. तिच्यावर आधीचा नवरा पीटर आंद्रेकडून मिळालेली २३०००० पाउंड म्हणजेच २.१५ कोटी रुपये किमतीची डायमंड रिंग विकण्याची वेळ आली.
पाच मुलांची आई असलेल्या केटीला गायक पीटरने तीन एग्जेंजमेंट रिंग्स दिल्या होत्या. त्यासोबत दोन मुलं ज्युनियर व प्रिन्सेस हे आहेत.
केटी व पीटरचं २००५ साली लग्न झालं होतं आणि चार वर्षांनंतर ते विभक्त झाले होते. केटी प्राइसला नोव्हेंबरमध्ये लंडनमधील कोर्टाने दिवाळखोर म्हणून जाहीर केलं.
तिला सूचना देऊनही ती कर्जाची हजारों पाउंडची रक्कम फेडू शकली नाही. तिच्यावर बँकेचं एकूण ४१३ कोटींचं कर्ज आहे. केटीला तिचा मकी मेन्शन नामक आलिशान बंगलादेखील विकावा लागू शकतो, असे सांगितलं जातंय. हा बंगला २०१४ साली १३ लाख युरोमध्ये विकत घेतला होता. आता या बंगल्याची किंमत १६ लाख युरो आहे.