Join us  

कियो वूलफोर्ड यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 8:43 PM

अमेरिकी टीव्ही सीरीज ‘हवाई फाइव-०’ चा अभिनेता कियो वूलफोर्ड (४९) यांचे निधन झाले आहे. त्यांनी २०१३ मध्ये आलेल्या ‘द ...

अमेरिकी टीव्ही सीरीज ‘हवाई फाइव-०’ चा अभिनेता कियो वूलफोर्ड (४९) यांचे निधन झाले आहे. त्यांनी २०१३ मध्ये आलेल्या ‘द हौमाना’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. हॉलिवूड रिपोर्टर डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कियो यांची प्रवक्ता ट्रेसी लरुआ हिने याबाबतचा खुलासा केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोमवारी ओआहू येथील एका हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. मृत्यूच्या तीन दिवस अगोदर त्यांना पक्षाघाताचा झटका देखील आला होता. होनोलूलू येथे राहणाºया कियो यांनी ‘हॅपी टेक्सास (१९९९), फॉलिंग फॉर ग्रेस (२००६) आणि गॉडजिला (२०१४)’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. कियो वूलफोर्ड यांनी बॅँड ब्राउनस्कीनचा सदस्य म्हणून वर्ल्ड टूरमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच ‘द किंग अ‍ॅण्ड आय’च्या स्टेज प्रॉडक्शनमध्ये ‘किंग आॅफ सियाम’च्या रुपात ३०० पेक्षा अधिक शो केले. प्रवक्ता ट्रेसी लरुआ हिने सांगितले की, त्यांनी नुकतेच ‘द हौमना’च्या सिक्वलची स्क्रीप्ट पूर्ण केली होती. नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातच चित्रपटासाठी आॅडिशन देखील सुरू करणार होते. मात्र त्यांचे हे स्वप्न अर्धवट राहिले. सिक्वलच्या स्क्रीप्टसाठी त्यांना प्रचंड मेहनत केली होती. मात्र अचानकपणे त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. दरम्यान कियो वूलफोर्ड यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर फॅन्सकडून त्यांना श्रद्धांजलीपर आधारित मेसेजेस पोस्ट केले जात आहेत.