Join us  

गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देणं किम कार्दशियनला पडलं महागात, भडकले नेटकरी, डिलिट केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:39 AM

Kim Kardashian : अलीकडेच अभिनेत्री किम कार्दशियनने गणपतीच्या मूर्तीसह स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला होता. मात्र, आता किमने तो फोटो डिलिट केलाय.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani-Radhika Marchant) यांचं लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाने या ग्रँड लग्नावर सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुकेश अंबानींनी आपल्या मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला भारतातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांनीही आपल्या मुलाच्या लग्नात जगातील प्रसिद्ध आणि मोठ्या व्यक्तींना आमंत्रित केले होते. अनंत-राधिकाच्या लग्नाला अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियन(Kim Kardashian)नेही हजेरी लावली होती.

अनंत-राधिकाच्या लग्नात किम कार्दशियन तिची बहीण ख्लोए कार्दशियनसोबत हजेरी लावली होती. पहिले दोन्ही बहिणी जोडप्याच्या भव्य लग्नात सहभागी झाल्या होत्या. यानंतर नवविवाहित जोडप्याच्या आशीर्वाद समारंभात कार्दशियन बहिणीही दिसल्या. यानंतर दोन्ही बहिणी मुंबईतील एका मंदिरात गेल्या होत्या. किमने ग्रँड वेडिंगशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. अलीकडेच, अभिनेत्रीने गणपतीच्या मूर्तीसह स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला आहे. मात्र, आता किमने तो फोटो डिलिट केलाय.

किमने का केला फोटो डिलिट?किम कार्दशियनने देसी लूकमधील स्वतःचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर करताना तिने लिहिले, 'अंबानींच्या लग्नासाठी हिरे आणि मोती'. यामध्ये किम पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे. एका फोटोत किमने गणेशाच्या मूर्तीसोबत पोजही दिली. किमने तिचे दोन्ही हात आणि चेहरा गणेशाच्या मूर्तीवर ठेवला होता. मात्र ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्रीने तो फोटो डिलीट केला. पण हा फोटो व्हायरल झाला.

किमला केलं ट्रोलगणपतीच्या मूर्तीच्या फोटोवरून किम कार्दशियनला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. एका यूजरने लिहिले की, 'तिने तो फोटो काढून टाकला, हे तिच्यासाठी चांगले आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, भारतीय संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही. तर आणखी एकाने लिहिले की, 'तिने आपल्या पोस्टवरून काढून टाकले का? मी स्वाइप केले आणि ते आता तेथे नाही, परंतु तिने असे काहीतरी केले याबद्दल मला आश्चर्य वाटले नाही. पुढे, एका युजरने लिहिले की, 'ती अमेरिकेतून आली आहे आणि गणेशाच्या मूर्तीसोबत अशी पोज दिली आहे. त्याला काही महत्त्व नाही, पण तिने हे फोटोशूट कुणाला तरी विचारून करून घ्यायला हवे होते. दुसऱ्याने कमेंट केली, 'हे अत्यंत चुकीचे आहे आणि त्याहूनही अधिक अपमानास्पद आहे की तुम्ही त्या संस्कृतीचे नाही'. 

टॅग्स :किम कार्देशियन