Join us

बापरे...! बिनधास्त सापांसोबत खेळताना दिसली किम कर्दाशियांची मुलगी, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:42 IST

किम कर्दाशियां बोल्ड फोटो व स्टाईलमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. नुकताच तिने तिच्या मुलगीचा सापांसोबत खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

किम कर्दाशियां बोल्ड फोटो व स्टाईलमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. नुकताच तिने तिच्या मुलगीचा सापांसोबत खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या मुलीला शूर म्हटलं आहे. मात्र हा व्हिडिओ जास्त लोकांना आवडला नाही. काही लोकांनी हा व्हिडिओ पाहून तिच्या मुलीचं कौतूक केलं तर काहींनी तिच्या पालकत्वावर टीका केली. 

किम कर्दाशियांने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिची मुलगी पिवळ्या रंगाचा साप गळ्यात लटकवून त्याच्यासोबत खेळताना दिसली. हा व्हिडिओ शिकागोमधील आहे. हा व्हिडिओ शेअर करत किमनं तिची मुलगी शूर असल्याचं सांगितलं.

काही लोकांना हा व्हिडिओ आवडला नाही. त्यांनी किमवर टीका करत तिला बेजबाबदार म्हटलं. एका युजरनं म्हटलं की, ही एक बेजबाबदार पालक आहे. एक लहान मुलं एक विषारी आणि एक बिनविषारी सापांसोबत असताना तिला फरक पडत नाही. तिला साप पकडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.

दुसऱ्या युजरनं लिहिलं की, हे बिघडलेल्या श्रीमंतांच्या मुलांचं खेळणं नाही. तो पण एक जीव आहे आणि ज्या प्रकारे त्या मुलीनं सापाला पकडलं आहे. त्यात तिला धोका आहे. आपल्या मुलांना जीव जंतुबद्दल थोडंफार आदरही शिकावावां.

तर आणखीन एका युजरनं म्हटलं की, हे टीव्ही शोसाठी होतं का? तुम्ही याला रिसर्च म्हणता का? प्राण्यांकडून रिएक्शन हवे म्हणून तुम्ही त्याला दुखावता आणि तुमच्या स्वतःच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवता.

 काही लोकांनी किम व तिच्या मुलीचं खूप कौतूकदेखील केलं. काहींनी किमच्या मुलीला शूर म्हटलं तर काही जण व्हिडिओ पाहून आश्चर्यचकीत झाले.

टॅग्स :किम कार्देशियन