Join us

पॉप सिंगर लेडी गागाने पोस्ट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:24 PM

हॉलिवूड गायिक आणि अभिनेत्री लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून  असे ट्विट केले की, सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.

ठळक मुद्देआतापर्यंत 84 हजार लोकांनी हे ट्विट लाईक केले असून 21 हजारांहून जास्त लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे.

संपूर्ण जगाला वेड लावणारी पॉप सिंगर लेडी गागा कायम चर्चेत असते. सध्याही लेडी गागा चर्चेत आहे.  हॉलिवूड गायिक आणि अभिनेत्री लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून  असे ट्विट केले की, सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत श्लोक ट्विट केला. क्षणत लेडी गागाची ही ट्विटर पोस्ट सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाली.

‘लोका: समस्ता: सुखिनोभवंतु’ हा संस्कृत श्लोक पोस्ट केला.  जगातील सर्व लोक सर्व प्रकारे आनंदी राहो, असा याचा मराठीत अर्थ असा होतो. लेडी गागाचे हे ट्विट अवघ्या काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाले

लेडी गागाचे हे ट्विट वाचून एकीकडे भारतीय चाहते आणि युजर्स सुखावले. तर दुसरीकडे जगातील इतर चाहते मात्र याचा अर्थ न समजल्याने गोंधळात पडले. संस्कृत न समजणा-या जगभरातील अनेक लोकांनी लेडी गागाच्या या ट्विटचा अर्थ  शोधण्याचे प्रयत्न केलेत. आतापर्यंत 84 हजार लोकांनी हे ट्विट लाईक केले असून 21 हजारांहून जास्त लोकांनी ही पोस्ट रिट्विट केली आहे. पण खास करून भारतीय चाहत्यांनी लेडी गागाच्या या ट्विटचे विशेष कौतुक केले आहे.

असा आहे संपुर्ण मंत्र

स्वस्तिप्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः।

गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

टॅग्स :लेडी गागा