Join us  

​लिओ दिसणार एल्विस प्रोड्युसर सॅम फिलिप्सच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 1:14 PM

आॅस्कर विजेता लिओनार्दो डिकॅप्रिओ लवकर ‘सन रेकॉर्ड्स’चा संस्थापक सॅम फिलिप्सच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रोड्यूस आणि त्यामध्ये अभिनयसुद्धा करणार आहे....

आॅस्कर विजेता लिओनार्दो डिकॅप्रिओ लवकर ‘सन रेकॉर्ड्स’चा संस्थापक सॅम फिलिप्सच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रोड्यूस आणि त्यामध्ये अभिनयसुद्धा करणार आहे.रॉक संगीताचा जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिलिप्सने एल्विस प्रिस्ले, जॉनी कॅश, कार्ल पर्किन्स यासारख्या महान गायकांची गाणी रेकॉर्ड्सवर रिलीज करून त्यांना जगासमोर आणले.पिटर गुरॅल्निक लिखित ‘सॅम फिलिप्स : द मॅन व्हू इन्व्हेंटेड रॉक-अ‍ॅन्-रोल’ पुस्तकावर पटकथा बेतलेली असणार आहे. मेम्फिस येथे १९५२ साली फिलिप्सने ‘सन रेकॉर्ड्स’ नावाने कंपनी स्थापन केली होती. जगप्रसिद्ध गायक एल्विस प्रिस्लेने सगळ्यात पहिले गाणे त्याच्याच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले होते.                                                                      सॅम फिलिप्स                                                                      सॅम फिलिप्स‘रॉक-अ‍ॅन्-रोल’ प्रकारातील सर्वात पहिले गाणे मानले जाणारे ‘दॅट्स आॅल राईट’ सन रेकॉर्ड्सनेच रिलीज केले होते. नव गायकांच्या रेकॉर्डिंग प्रसिद्ध करण्याबरोबरच त्याने अनेक गायकांना एकत्र करून त्यांचे शोज्सुद्धा आयोजित केले होते. डिसेंबर १९५६ मध्ये ‘मिलियन डॉलर क्वार्टेट’ सेशनमध्ये प्रिस्ले, कॅश, पर्किन्स आणि जेरी ली लुईस अशा एकाहून एका श्रेष्ठ गायकांनी एकत्र परफॉर्म केले होते.अशा या संगीत क्रांतीकारकाचे २००३ साली निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या बायोपिकची चर्चा असून आता लिओच्या सहभागामुळे लवकरच चंदेरी पडद्यावर तो साकारला जाणार आहे. आॅस्कर विजयानंतर तो कोणती भूमिका स्विकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते.                                                                      एल्विस प्रिस्ले                                                                                 सॅम फिलिप्स आणि एल्विस प्रिस्लेदरम्यान अभिनयापेक्षा निर्मितीच्या क्षेत्रात तो अधिक सक्रीय होता. वातावरणात होणाऱ्या बदलांविषयीची डॉक्युमेंटरी ‘बीफोर द फ्लड’ आणि हस्तीदंताच्या अवैध तस्करीसंबंधी ‘द आयव्होरी रेस’ची त्याने निर्मिती केली.याबरोबरच तो बराच काळापासून रखडलेला ‘द डेव्हिल इन द व्हाईट सिटी’ प्रोजेक्टही सुरू करणार असल्याची चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात त्याने पर्यावरणविषयक कार्टून ‘कॅप्टन प्लॅनेट’वर चित्रपटात काढण्यात रस असल्याचे सांगितले.