Join us  

मॅडोनाने जुळ्या आॅफ्रिकन मुलींना घेतले दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 4:59 PM

पॉप गायिका मॅडोना हिने जुळ्या आॅफ्रिकन मुलींना दत्तक घेतले आहे. मलावी येथून दत्तक घेतलेल्या या मुलींविषयीच्या वृत्ताला तिच्या मित्रपरिवाराकडून ...

पॉप गायिका मॅडोना हिने जुळ्या आॅफ्रिकन मुलींना दत्तक घेतले आहे. मलावी येथून दत्तक घेतलेल्या या मुलींविषयीच्या वृत्ताला तिच्या मित्रपरिवाराकडून दुजोरा देण्यात आला आहे. याविषयी मॅडोनाने सांगितले की, मला खूप आनंद होत आहे की, या मुली आता माझ्या परिवाराचा भाग बनल्या आहेत. मॅडोनाने यापूर्वीदेखील आफ्रिकी देशातून मुलींना दत्तक घेतले आहे. डेव्हिड नावाच्या मुलाला २००६ मध्ये तर मर्सी नावाच्या मुलाला २००९ मध्ये तिने दत्तक घेतले होते. आता तिच्या परिवारात आणखी दोन सदस्यांचा समावेश झाला आहे. ५८ वर्षीय मॅडोना गेल्या महिन्यात लिलोंगवे येथील न्यायालयात पोहचली होती. ज्याठिकाणी तिने दोन लहान मुलींना दत्तक घेण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानुसार तिने दोन जुळ्या मुलींना दत्तक घेतले आहे. या दोघांचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, आता दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या दोन्ही मुली माझ्या परिवाराचा भाग बनल्या आहेत. त्याचबरोबर माध्यमांनादेखील तिने आवाहन केले आहे की, तिच्या खासगी जीवनाचा त्यांनी सन्मान करावा. तिला या सर्व प्रक्रियेसाठी मदत करणाºयांचेदेखील तिने आभार मानले. गेल्या दोन आठवड्यांपासून ती मुली दत्तक घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. सुरुवातीला तिने यास नकारही दिला होता. आता या वृत्ताला तिनेच दुजोरा दिला आहे.