सुंदर चेहरा, बुद्धी असे सगळे काही असूनही नवरा मुलगा मिळत नाहीये, याला तुम्ही काय म्हणाल? होय, जॉय स्टैर्ले या सौंदर्यवतीची समस्या नेमकी हिच आहे. आरस्पानी सौंदर्य हेच तिच्या लग्नाच्या आड येतेय. 23 वर्षांच्या जॉयने गेल्या काही वर्षात देशभरातील कित्येक सौंदर्य स्पर्धांचे किताब पटकावले. पण जोडीदाराचे म्हणाल तर ती शोधून शोधून थकली. देखण्या रूपामुळे चांगली मुलं भेटत नसल्याचा दावा तिने केला आहे.
तिचे सौंदर्य पाहून खरे तर प्रत्येक जण तिच्याकडे आकर्षित होत. पण जॉयचे मानाल तर यापैकी बहुतांश पुरूष तिच्या शारिरीक सौंदर्यावर भाळतात. ‘मी जशी राहते, दिसते त्यामुळे माझ्याकडे विचित्र मुलंच आकर्षित होतात. याऊलट चांगली मुले माझ्यासोबत बोलताना संकोचतात. एखादा दयाळू, कुटुंबाकडे लक्ष देणारा, करिअरला महत्त्व देणा-या मुलाच्या शोधात आहे,’ असे जॉयने सांगितले.