Join us

Met Gala 2022: वॉशरुममध्ये सेलेब्सने केले असे काही की 'मेट गाला'चे बदलावे लागले नियम, प्रियंकाच्या नावाचादेखील समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 2:07 PM

Met Gala 2022 : दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये, वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले आउटफिटमध्ये पाहायला मिळतात, त्यांच्या या आउटफिटची चर्चा जगभरात होताना दिसते.

Met Gala 2022 : जगातील सर्वात मोठा फॅशन इव्हेंट आज पार पडणार आहे. 'इन अमेरिका: अॅन अँथॉलॉजी ऑफ फॅशन' या थीमसह यंदाचा मेट गाला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात होत आहे. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्याची जगभरात चर्चा होताना दिसत आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हेनेसा फ्रीडमन, रेजिना किंग, ब्लेक लाइव्हली, रायन रेनॉल्ड्स, लिन-मॅन्युएल मिरांडा करणार आहेत. या इव्हेंटमध्ये, आपल्याला दरवर्षी वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सने डिझाइन केलेले कपडे पाहायला मिळतात, जे सेलेब्स परिधान करून रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करताना दिसतात. दरवर्षी त्याची थीम ठरवली जाते, त्यानुसार सेलेब्स गेटअप करतात. परंतु या थीमशिवाय, यंदा मेटगालामध्ये पाच नियम ठेवण्यात आले आहे.

वयाची अटमेट गालाने आपल्या नियमांमध्ये वयोमर्यादेचा नियम समाविष्ट केला आहे. या नियमानुसार १८ वर्षांखालील लोकांना या फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे. इव्हेंटच्या प्रवक्त्याने या निर्णयाची पुष्टी केली, "हा कार्यक्रम १८ वर्षाखालील लोकांसाठी योग्य नाही."

सेल्फीवर बंदी२०१५ पासून या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. प्रसिद्ध सेलिब्रिटींनी कार्यक्रमाचा बहुतांश वेळ फोनवर घालवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सेलिब्रिटींना पाठवलेल्या नोटीसमध्ये, "फोटोग्राफी आणि सोशल मीडियासाठी फोन वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही," असे म्हटले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी हा नियम मोडला आहे. यामध्ये काइली जेनर आणि भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश आहे. २०१७ मध्ये कायली आणि २०१८ मध्ये प्रियांकाने हा नियम मोडला होता.

धुम्रपान निषिद्धबेला हदीद आणि डकोटा जॉन्सन यांच्यासह सेलिब्रिटी २०१७ मध्ये मेट गाला कार्यक्रमात बाथरूममध्ये धूम्रपान करताना दिसले. त्यानंतर, मंडळाच्या सदस्यांनी निर्णय घेतला की कार्यक्रमात धूम्रपान केले जाणार नाही. या कारणास्तव २०१८ मध्ये ‘संग्रहालयात धूम्रपान करणे बेकायदेशीर आहे’ असा नियम करण्यात आला होता. तेव्हापासून मेट गालामध्ये धूम्रपान करण्यास मनाई आहे.

जेवणात कांदा नाहीमेट गाला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना कॉकटेल आणि डिनर दिले जाते. परंतु या कार्यक्रमात कांदा आणि लसूण वापरण्यास मनाई आहे, जेणेकरून तोंडातून उग्र वास येणार नाही. याशिवाय सेलेब्सच्या कपड्यांवर काहीही पडू नये म्हणून ब्रुशेटा देखील जेवणात दिला जात नाही.

सीटिंग अरेंजमेंटवोगचे विशेष प्रकल्प संचालक, सिल्व्हाना वॉर्ड ड्युरेट यांनी सांगितले की, अनेक सेलिब्रिटींना सीटवर बसण्यासाठी त्यांची पॉवर आणि पोझिशनचा वापर करायचा असतो. कार्यक्रमात, कोण कोणाच्या शेजारी बसेल, गेल्या वर्षी कोण कोणाच्या शेजारी बसले होते हे देखील लोकांच्या नजरेत येते. त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊन आसनव्यवस्था करण्यात आली आहे, जी कोणीही बदलू शकत नाही.

टॅग्स :मेट गालाप्रियंका चोप्राकायली जेनर