Join us  

​मिला कुनिस आणि अ‍ॅश्टन कुचरला पुत्ररत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2016 1:52 PM

हॉलीवूड स्टार कपल मिला कुनिस आणि अ‍ॅश्टन कुचर यांनी त्यांच्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले असून ३० नोव्हेंबर रोजी मिलाने ...

हॉलीवूड स्टार कपल मिला कुनिस आणि अ‍ॅश्टन कुचर यांनी त्यांच्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले असून ३० नोव्हेंबर रोजी मिलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ‘नो स्ट्रिंग्ज अ‍ॅटॅच्ड’ स्टार अ‍ॅश्टन आणि ‘फ्रेंडस् विथ बेनिफिटस्’ स्टार कुनिस यांना पहिली मुलगी आहे. ‘वॅट इजाबेल’ असे तिचे नाव. मागच्या वर्षी अत्यंत साध्यापद्धतीने दोघांनी विवाह केला होता. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात एका मुलाखती दरम्यान अ‍ॅश्टनने दुसरे अपत्य मुलगा असल्याचे सांगितले होते. घरी नवीन बाळ येणार म्हणून वॅट किती एक्सायटेड आहे हे सांगताना तो मिलाकडे बोट दाखवत म्हणाला होता की, ‘आमची मोठी मुलगी मिलाच्या पोटाकडे पाहून ‘माझ भाऊ’ म्हणून हाक मारते.’पहिले मूलं असूनही अ‍ॅश्टन दुसऱ्या अपत्याच्या वेळीसुद्धा नर्व्हस होता. तो म्हणतो, ‘बाळाला जन्म देणे ही खूप वेगळी गोष्ट असते. कोणतीच गोष्ट तुम्हाला यासाठी प्रशिक्षित करत नसते. पहिली मुलगी असून मी आणि मिला दुसऱ्या मुलासाठी फार नर्व्हस होतो. खरं सांगायचे तर मुलांना जन्म देणे आणि त्यांचा सांभाळ करणे फार अवघड आहे.’                                                                      हॅपी फॅमिली : मुलगी वॅट इजाबेलासोबत अ‍ॅश्टन कुचर आणि मिला कुनिसअ‍ॅश्टन आणि मिलाने ‘दॅट्स ७०ज् शो’मध्ये एकत्र काम केलेले आहे. २०१२ साली त्यांनी डेटिंग सुरू केली. त्यापूर्वी मिला ‘होम अलोन’ फेम मॅकॉली कल्किनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अ‍ॅश्टननेसुद्धा डेमी मूरशी २०१० साली लग्न केले होते; परंतु तीन वर्षांनी त्याने तिला घटस्फोट दिला. आॅक्टोबर २०१४ मध्ये कुनिसने त्यांची पहिली मुलगी वॅट इजाबेलला जन्म दिला होता. दुसऱ्या मुलासाठी ‘सीएनएक्स मस्ती’कडून अ‍ॅश्टन आणि कुनिसला खूप खूप शुभेच्छा!