Join us

आराराराss खत्तरनाssक!! जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 4:38 PM

द हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली.

ठळक मुद्देएचबीओवरील लोकप्रिय मालिका असलेल्या गेम ऑफ थ्रोनपेक्षाही द लॉर्ड ऑफ रिंग्ज महागडी वेब सिरीज ठरणार आहे. गेम ऑफ थ्रोनच्या एका भागासाठी जवळपास 100 मिलियन्स डॉलरचा खर्च येतो.

लॉर्ड ऑफ रिंग्ज प्रिक्वेल सिरीज अमेझॉनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरीजच्या पहिल्या भागासाठी तब्बल 465 मिलियन्स डॉलर म्हणजेच 3,408 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. टेलिव्हीजन विश्वातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी अन् महागडी सिरीज असणार आहे. लॉर्ड ऑफ रिंग्जसाठी अमेझॉनने एकूण 1 बिलियन्स डॉलर एवढा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. 

हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली. अमेझॉन स्टुडिओचे प्रमुख जेनिफर सल्के यांनीही काही दिवसांपूर्वी माहिती देताना म्हटले होते की, द लॉर्ड ऑफ रिंग्जचे बजेट मोठ्या प्रमाणातील 'विश्वनिर्मिती'च्या चित्रीकरणामुळे आहे. मध्य-पृथ्वीच्या स्थापनेपासून वेशभूषा, रंगमंच आणि LOTR मध्ये सहभागी वर्ण प्रजातींसह वास्तव या सिरीजमध्ये झळकणार आहे. न्यूझीलंडचे पर्यटनमंत्री स्टुअर्ट नॅश यांनीही अमेझॉनच्या या सिरीजचं कौतुक केलं असून ही आत्तापर्यंतची सर्वाधिक खर्च होत असलेली मालिका असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, वास्तविक ही एक शानदार सिरीज आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, एचबीओवरील लोकप्रिय मालिका असलेल्या गेम ऑफ थ्रोनपेक्षाही द लॉर्ड ऑफ रिंग्ज महागडी वेब सिरीज ठरणार आहे. गेम ऑफ थ्रोनच्या एका भागासाठी जवळपास 100 मिलियन्स डॉलरचा खर्च येतो. अमेझॉनच्या वर्ल्ड ऑफ रिंग्जच्या पहिल्या सिजनच्या खर्चाच्या चारपटीने ही रक्कम कमी आहे. या बेब सिरीजच्या पहिल्या भागासाठी भारतीय चलनानुसार ३४ अब्ज, १ कोटी, ३३ लाख, ७८ हजार २५० रुपये एवढा खर्च होणार आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनवेबसीरिजगेम ऑफ थ्रोन्सहॉलिवूड