नववर्षाच्या सुरुवातीलाच हॉलीवूडमधून वाईट बातमी येत आहे. एका विमान अपघातात अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हर आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. ओलिवरच्या विमानाने उड्डाण घेताच ते कॅरेबिअन समुद्रात कोसळले.
ओलिव्हर यांनी जॉर्ज क्लूनीसोबत द गुड जर्मन आणि २००८ च्या स्पीड रेसर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. रॉयल सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिस दलाने ओलिव्हरच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विमान कोसळल्यानंतर स्थानिक मच्छीमार, गोताखोर आणि तटरक्षक दलाने मदतकार्य केले. यावेळी पाण्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. ५१वर्षीय ऑलिव्हर यांच्यासह त्यांची मुलगी मदिता (१०), अॅनिक (१२) आणि विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्स यांचा मृतदेह सापडला आहे.
विमानाने गुरुवारी दुपारी ग्रेनाडाइन्सचे छोटे बेट बेक्वियाहून सेंट लूसियासाठी उड्डाण केले. नववर्षाच्या सुट्ट्या एंजॉय करण्यासाठी ओलिव्हर त्याच्या मुलींसोबत आला होता. तेथून माघारी परतत असताना हा अपघात झाला आहे. ऑलिव्हर यांनी 60 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यामध्ये टॉम क्रूझच्या वाल्कीरी चित्रपटातील एक छोटी भूमिकाही आहे.