लहानांपासून मोठ्यांपर्यंत एका व्यक्तिरेखेने सर्वांना वेड लावलं तो म्हणजे 'मिस्टर बीन'. रॉवन ॲटकिन्सन या अभिनेत्याने मिस्टर बीनची भूमिका अजरामर केली. रॉवनला या भूमिकेमुळे जगभरात भरपूर लोकप्रियता मिळाली. मिस्टर बीन ही व्यक्तिरेखा अशी आहे जी आजही आठवली की, आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. मिस्टर बीनची भूमिका साकारणारा अभिनेता रॉवनचा एक फोटो व्हायरल झालाय. ज्यामध्ये अभिनेता अंथरुणावर खिळताना दिसल्याने त्याच्या चाहत्यांना काळजी वाटली. पण या फोटोमागचं सत्य वेगळंच असल्याचा खुलासा झालाय.
'मिस्टर बीन'च्या अंथरुणावर खिळलेल्या फोटोमागचं सत्य काय?
मिस्टर बीनची भूमिका साकारणाऱ्या रॉवन ॲटकिन्सचा अंथरुणावर खिळलेला एक फोटो व्हायरल झालाय. यात अभिनेत्याची खूपच वाईट अवस्था दिसतेय. या फोटो पाहून रॉवनच्या जगभरातल्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. पण या फोटोमागचं सत्य समोर आल्यावर चाहत्यांना दिलासा मिळालाय. क्रेस्केंडो या फॅक्ट चेक टीमने याविषयी शोध घेतला असल्यास त्यांना हा फोटो फेक असल्याचं समजलंय.
रॉवनची प्रकृती ठणठणीत
रॉवनच्या जवळच्या व्यक्तींकडून अभिनेत्याची प्रकृती गंभीर आहे अशी कोणतीही बातमी समोर आली नाही. हा फोटो संपूर्णपणे फेक होता. रॉवनने अलीकडेच १० जुलै २०२४ ला फॉर्म्युला वन रेसिंग इव्हेंटमध्ये मुलाखत दिली. यावेळी तो एकदम फिट अँड फाईन अन् तंदुरुस्त पाहायला मिळाला. याशिवाय व्हायरल झालेला फोटो हा बैरी बाल्डरस्टोन या व्यक्तीचा होता. २०२० सालचा हा फोटो आहे. पुढे त्या व्यक्तीचं निधन झालं. AI च्या मदतीने कोणीतरी रॉवनचा फोटो त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी जोडला आणि व्हायरल केला.