Join us

जोनास कुटुंबात पुन्हा होणार एक लग्न! जो आणि सोफी नव्या वर्षात बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:03 PM

निकनंतर जोनास कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. होय, प्रियांका व निकच्या लग्नानंतर  निकचा मोठा भाऊ जो जोनास हाही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे थाटामाटात लग्न केले. यावेळी अख्खे जोनास कुटुंब हजर होते. जोनास कुटुंबाने हे लग्न अगदी मनापासून एन्जॉय केले. निकनंतर जोनास कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. होय, प्रियांका व निकच्या लग्नानंतर  निकचा मोठा भाऊ जो जोनास हाही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. होय, येत्या नव्या वर्षात दोघेही लग्न करणार आहेत. हे लग्न फ्रान्समध्ये हाईल, असे कळतेय. आॅक्टोबर २०१७ मध्ये जो आणि सोफी यांनी एंगेजमेंट केली होती.

जो जोनास हा निकपेक्षा ३ वर्षांनी मोठा आहे. सोफीबद्दल सांगायचे तर अमेरिकन टीव्ही सीरिज ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये ती दिसली होती. ही सीरिज प्रचंड लोकप्रीय ठरली होती. 

प्रियांका व निकच्या लग्नात जो आणि सोफी दोघेही हजर होते. यादरम्यानच्या अनेक कार्यक्रमात सोफीचा पारंपरिक लूक चांगलाच चर्चेत राहिला. प्रियांकाच्या संगीत सेरेमनीत सोफीने खास परफॉर्मन्स दिला. त्याचीही चांगली चर्चा झाली. 

गत १ डिसेंबरला प्रियांका व निक दोघेही ख्रिश्चन पद्धतीने लग्नबेडीत अडकले. यानंतर २ डिसेंबरला दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्नगाठ बांधली. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतूर होते. पण या लग्नाचा एकही फोटो समोर आला नाही. 

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्रा