Join us

Nick Jonas: लाईव्ह कॉन्सर्टमध्येच स्टेज सोडून पळाला निक जोनास, नक्की काय घडलं? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:46 AM

निक जोनास जीवाच्या भीतीने का पळाला?

'देसी गर्ल' प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनास (Nick Jonas) हॉलिवूडचा लोकप्रिय पॉप स्टार आहे. 'जोनास ब्रदर्स' ची हॉलिवूडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट्स नेहमी हाऊसफुल असतात. अनेकदा जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्ट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियंकाही बरेचदा या कॉन्सर्टमध्ये हजर असते आणि पतीला चिअर करत असते. मात्र नुकतंच निक जोनास लाईव्ह कॉन्सर्टमध्येच गाणं सोडून चक्क पळून जाताना दिसला. नक्की काय घडलं वाचा.

गायक निक जोनासचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये तो स्टेजवर एके ठिकाणी बसलेला दिसतोय आणि एकटक ऑडियन्सकडे बघतोय. नंतर अचानक उठून तो बॅकस्टेज पळतो आणि आपल्या सहकाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना 'अबॉर्ट अबॉर्ट' असे संकेत देतो. सगळेच नंतर निकच्या मागे धावत जातात. प्रागमधील कॉन्सर्टचा हा व्हिडिओ आहे जो फॅन पेजेसने शेअर केला आहे. 

निक स्टेजवर असताना प्रेक्षकांमधून कोणीतरी त्याच्यावर लेजरने निशाणा लावला होता अशी माहिती नंतर समोर आली. याचाच अर्थ निकच्या जीवाला कदाचित धोका होता असाही संशय व्यक्त केला गेला. नंतर त्या व्यक्तीला कार्यक्रमातून काढण्यात आलं आणि शो पुन्हा सुरु झाला.

या घटनेनंतर जोनास ब्रदर्सकडून अद्याप कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. मात्र या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. 

टॅग्स :निक जोनाससोशल मीडियासंगीतहॉलिवूड