निम्रतने घेतली ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर रिस्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 04:53 PM2016-10-26T16:53:02+5:302016-10-26T16:54:25+5:30
आपले कौशल्य पणाला लागेल असे काही काम करण्यातच काही लोकांना समाधान प्राप्त होते. अशा ‘वाईल्ड स्पिरीट’ लोकांमध्ये निम्रत कौरचा ...
आ ले कौशल्य पणाला लागेल असे काही काम करण्यातच काही लोकांना समाधान प्राप्त होते. अशा ‘वाईल्ड स्पिरीट’ लोकांमध्ये निम्रत कौरचा सामावेश होतो. ‘सिक्स्थ सेन्स’ फेम हॉलीवूड दिग्दर्शक एम. नाईट शामलनच्या ‘वेवर्ड पाईन्स’ या टीव्ही सिरीजमधील भूमिका केवळ आव्हानात्मक होती म्हणून स्वीकारल्याचे ती सांगते.
ही एक सायन्स फिक्शन प्रकारातील थ्रीलर सिरीज असून तिचे आतापर्यंत दोन सीझन्स टेलिकास्ट झालेले आहेत. ती म्हणते, ‘अशा प्रकारचे शो मी पाहत नाही आणि मला ते आवडत नाही. म्हणून तर यामध्ये काम करणे माझ्यासाठी एक चॅलेंज होते. ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर रोल करायला मिळणार म्हणून आनंदाने ही भूमिका स्वीकारली.’
‘वेवर्ड पाईन्स’मध्ये निम्रत रेबेका येडलिनची व्यक्तिरेखा करते. यावर्षी अक्षय कुमारसोबत ‘एअरलिफ्ट’ केल्यानंतर ती या सिरीजमध्ये झळकली. ‘वेगळी स्टारकास्ट आणि कामाची पद्धती यांचा अनुभव खूपच छान होता. ‘एअरलिफ्ट’नंतर अशा सिरीजमध्ये झळकण्याची संधी मिळणे माझ्यसाखी खूपच आनंदाची गोष्ट आहे, असे ती सांगते.
पोस्टर :वेवर्ड पाईन्स
प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवाह मिळवलेल्या ‘द लंच बॉक्स’मधून पदार्पझ केलेली निम्रत हिंदी सिनेमे निवडण्याच्या बाबतीत फार दक्ष आणि चोखंदळ आहे. ‘लंचबॉक्स’नंतर दुसरा चित्रपट स्वीकारण्यासाठी तिने तीन वर्षे घेतली. ‘वेवर्ड पाईन्स’नंतर कोणता बॉलीवूड सिनेमा स्वीकारणार यावर ती म्हणते, मी परत आले असून स्क्रीप्टस् वाचत आहे. अद्याप तरी कोणतेच नाव निश्चित केलेले नाही.